#कारणराजकारण- ...अखेर गिरीजा बापट यांचे 'अहों'बाबतचे भाकीत खरे ठरले! 

भाजपचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विजयानंतर शहरभर उत्सव साजरा होत असतानाच त्यांच्या शनिवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी जल्लोष सुरू होता. बापट यांच्या स्वागतासाठी गिरिजावहिनींनी स्वत: आकर्षक रांगोळी काढून त्यांच्या स्वागताची जोरदार तयार केली. त्यांच्या जोडीला नातेवाइक आणि मैत्रिणीही आर्वजून आल्या. घरात येणारा प्रत्येकजण गिरिजावहिनींचे अभिनंदन करत होता.
#कारणराजकारण- ...अखेर गिरीजा बापट यांचे 'अहों'बाबतचे भाकीत खरे ठरले! 

पुणे : "निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं. "अहोंच्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. पण नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही. परंतु खूप मते मिळाली...'' हे भाकीत होते, भाजपचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात, पत्नी गिरीजा बापट यांचे. आपल्या 'अहों'च्या विजयानंतर गिरीजावहिनी मोकळेपणाने बोलत होत्या.

भाजपचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विजयानंतर शहरभर उत्सव साजरा होत असतानाच त्यांच्या शनिवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी जल्लोष सुरू होता. बापट यांच्या स्वागतासाठी गिरिजावहिनींनी स्वत: आकर्षक रांगोळी काढून त्यांच्या स्वागताची जोरदार तयार केली. त्यांच्या जोडीला नातेवाइक आणि मैत्रिणीही आर्वजून आल्या. घरात येणारा प्रत्येकजण गिरिजावहिनींचे अभिनंदन करत होता.  "आमदार आणि मंत्री झाल्यानंतर आम्ही मुंबईत जायचो. तिथे सरकारी बंगल्यात राहायचो. तिथे पाहुण्यांचे खूप छान स्वागत करायचो. गणेशोत्सवही साजरा केला. पण, मुंबईतील घर मला आपले कधीच वाटले नाही,'' हेही त्यांनी सांगितले. मात्र, आता खासदार झाल्यानंतर दिल्लीत राहायला आवडेल का ? यावर स्मितहास्य करून त्यांनी होकार दिला. 

गिरीजा बापट यांनी पती गिरीश बापट यांचा संपूर्ण राजकीय प्रवास पाहिला आहे. बोहल्यावर चढल्याच्या दुसऱ्या वर्षी बापट यांनी पोटनिवडणूक लढवली. १९८३ ला त्यांनी निवडणूक लढवली १९८४ मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर १९८५ मध्ये बापट यांनी पुन्हा पोटनिवडणूक लढवली. त्यानंतर त्यांच्या विजयाची कमान कायम उंचावतच गेली. नगरसेवक ते खासदार हा प्रवास त्यांच्या पत्नीने पाहिला. प्रत्येक राजकीय यशानंतर त्यांच्या पत्नीनेही बढतीची स्वप्न पाहिली. त्यामुळेच बापट कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मुंबईनंतर त्यांना दिल्ली गाठायची होती. ते त्यांनी करून दाखविलं, असेही गिरीजावहिनींनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com