शिरूरचा गुलाल उधळण्यावरून बांदल व गावडे यांच्यात `चकमक`

शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांत `चकमक` उडाली. संभाव्य निकालबाबत `सरकारनामा फेसबुक लाइव्हवर झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीकडून मंगलदास बांदल आणि शिवसेनेकडून राम गावडे यांनी बॅंटिंग केली.
शिरूरचा गुलाल उधळण्यावरून बांदल व गावडे यांच्यात `चकमक`

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत एकूण मतदानाचा आकडा गेल्या वेळेच्या तुलनेत दोन टक्क्यांनी घटला. परंतु, त्यामुळे या मतदारसंघात नक्की कोण विजयी होणार, याचा अंदाज लागणे कठीण झाले आहे.

शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच विजयी चौकार मारणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत, तर राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार डा. अमोल कोल्हे हे आढळराव पाटील यांना क्लिन बोल्ड करणार, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण विजयाचा गुलाल उधळणार, हे जाणून घेण्यासाठी `सरकारनामा`ने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे व राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्याशी संवाद साधला. त्यात दोघांनीही आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे सांगतले.

मंगलदास बांदल यांनी विजयीचे गणित मांडताना सांगितले की, दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र, सुरवातीला आढळऱाव पाटील यांनी मोठे आव्हान उभे केले होते. त्यांनी अगदी सांगितले होती, ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, शरद पवार, अजित पवार यापैकी कोणीही आले तरी मी ही निवडणूक जिंकणार. तीही लाखोच्या फरकाने जिंकणार. सगळे नेते मला घाबरतात. मात्र, अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. तसेच, राज ठाकरे यांच्या मनसेच्या हडपसर, जुन्नर व भोसरी भागातील कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून काम केले. एवढचं नव्हे तर अमोल कोल्हे यांना निवडून आणले नाही तर आम्ही राजकीय संन्यास घेऊ, अशी भूमिका घेतली. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी खांद्याला खांदा लावून मनापासून काम केले. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.

राम गावडे म्हणाले, ``शिवसेना 2004 पासून विकासाचे प्रश्न घेऊन लढली आणि सातत्याने चढत्या मताधिक्याने विजयी झाली. गेल्या तीन टर्म जनतेला आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रंचड मदत केली. विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढली. शरद पवार, अजित पवारही आव्हान देऊन मागे गेले.

बैलगाडा शर्यत बंदी ही काॅंग्रेस- राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या काळात झाली. त्याला आम्हीच आव्हान दिले. न्यायलयीन लढाई लढली. विमानतळाचा अहवालही राष्ट्रवादी कांग्रेस व अजित पवार पालकमंत्री असताना दाबून ठेवला. आम्ही जातपात, धर्माचे राजकारण केले नाही. 14 हजार 500 कोटीचा डीपीआर तयार केला. 10 वर्षांत कांग्रेसने एक रुपया दिला नाही. गेल्या पाच वर्षात मोदी, गडकरी यांनी कामे दिली. त्यामुळे लोकं निश्चितपणे आमच्यासोबत राहतील, हा आम्हाला विश्वास आहे. अभिनेता स्क्रीपट वाचू शकतो. मात्र, लोकनेता होऊ शकत नाही, हे लोकांनी ओळखले. त्यामुळे आढळराव पाटील 100 टक्के निवडून येतील, असा दावा गावडे यांनी केला.        

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com