...आता शिवसेनेचाही आमदार योगेश टिळेकरांवर हल्लाबोल

विरोधी पक्षांकडून नेहमी टिकेचे लक्ष्य झालेल्या आमदार योगेश टिळेकरांवर आता मित्रपक्ष शिवसेनेने हल्ला चढविला आहे. त्यामुळे येथील मतदारसंघ कोणाला सुटणार आणि उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
...आता शिवसेनेचाही आमदार योगेश टिळेकरांवर हल्लाबोल

हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून दोन वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याबरोबरच शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्याला त्यांची जागा दाखवणार, असा इशारा हडपसरमधील शिवसेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार व पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते. माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, उपशहरप्रमुख समीर तुपे, सहसंपर्कप्रमुख विजय देशमुख, विधानसभा अध्यक्ष तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, जान मोहम्मद शेख, नगरसेविका प्राची आल्हाट, मारुती ननावरे, आशिष आल्हाट, महेंद्र बनकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे म्हणाले हडपसर विधानसभा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असून मागच्या निवडणुकीत युती तुटल्याने स्वतंत्र लढवून भाजपचा उमेदवार निवडून आला, हडपसर विधानसभा मतदारसंघा शिवसेनेची ताकद जास्त असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रही मागणी आम्ही सर्व इच्छुक उमेदवार व पदाधिकारी करणार आहोत.

हडपसर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात आमदारांनी कोणतीही कामे केली नाहीत सर्व कामे प्रलंबित असून केवळ कोट्यावधी रुपयाची आकडेवारी सांगितली जाते प्रत्यक्षात कामे झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेना खेचून आणणारा व भगवा फडकविणार  असा विश्‍वास माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभर जन आशीर्वाद यात्रा सुरू असून त्याचा दौरा हडपसर परिसरात येणार आहे त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जोरदार तयारी करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष तानाजी लोणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक विकास कामे रखडलेली असताना  शिवसेना संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना घरी बसविणार, असा इशारा उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी दिला.

युतीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याची जोरदार तयारी सुरू आहे, त्यातच हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर व नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार चुरस असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना करीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com