`हडपसरच काय, पुण्यातील एकही जागा शिवसेनेला युतीत मिळणार नाही`

`हडपसरच काय, पुण्यातील एकही जागा शिवसेनेला युतीत मिळणार नाही`

पुणे : हडपसरच काय, पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही जागा शिवसेनेला सोडली जाणार नाही. त्यामुळे मी निश्चिंत आहे, असा दावा हडपसरचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी केला.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याचे वृत्त `सरकारनामा`ने दिले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना टिळेकर यांनी हे मत व्यक्त केले.

``मी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात जे काम केले आहे, एवढे मोठे काम यापूर्वीच्या कोणत्याही आमदारांनी केलेले नाही. त्यामुळे जनमत माझ्या बाजूने असून पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही, याची मला खात्री आहे. मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल,``असे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे शिवसेनेला हा मतदारसंघ मिळणार असल्याच्या वृत्ताने तेथील इच्छुकांनी समाधानाचा सुस्करा सोडला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

याबाबत माजी आमदार महादेव बाबर यांच्याशी संपर्क साधला असता मलाच उमेदवारी मिळेल याची मला खात्री असून मी आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच उमेदवारी कोणालाही मिळो, तरी मी प्रामाणिकपणे शिवसेनेचेच करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

या विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक प्रमोद भानगिरे हे देखील शिवसेनेकडून मलाच उमेदवारी मिळेल असा दावा करीत आहेत. त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईमध्ये तळ ठोकला आहे व आवश्यक ती जुळवाजुळ ते करीत आहेत.

इंदापूरची जागा भाजपला सोडून त्याजागी हडपसर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेलाच सोडली असल्याची चर्चा `सरकारनामा`मुळे राजकीय पटलावर सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com