सुप्रिया सुळेंसाठी भोरमध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडून एकत्रित प्रचार कधी?

सुप्रिया सुळेंसाठी भोरमध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडून एकत्रित प्रचार कधी?

भोर : बारामती लोकसभा मतदारसंघातील कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी व इतर घटक पक्षांचा भोरमध्ये एकत्रितपणे प्रचार अद्यापही सुरु झालेला नाही.

या निवडणुकीबाबत भोर तालुका कॉंग्रेस पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रीया येत नसल्यामुळे कार्यकर्ते व मतदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था झाली आहे. भोर तालुक्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे की नाही, असा प्रश्नही नागरिक विचारू लागले आहेत.

इंदापूर तालुक्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पुरंदर तालुक्यातील काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांना पाठींबा जाहीर केलेला आहे. त्यांचा एकत्रित प्रचारही सुरु झाला आहे. मात्र कॉग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोर व वेल्हे तालुक्यातील काॅंग्रेसचे सर्वेसर्वा विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी अद्यापही आपला निर्णय जाहीर केला नाही.

तालुक्यातील कॉग्रेसचे काही पदाधिकारी हे महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारसभेलाही हजर होते. याशिवाय काॅंग्रेसच्या काही पदाधिका-यांकडून सोशल मिडीयावर कांचन कुल यांचा प्रचारही सुरु केला आहे. त्यामुळे भोर तालुक्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु केलेला आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी तालुक्याच्या सर्वच ठिकाणी जाऊन प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. मात्र यामध्ये काॅंग्रेसचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com