पुण्यातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या आठ दिवसात दीडशेंनी वाढली

जिल्ह्यात एकूण १ हजार ९७९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
corona

corona

Sarkarnama

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढत असलेली नवीन कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.२७) काहीशी कमी झाली आहे.सोमवारी दिवसात जिल्ह्यात १५८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शहरात ही संख्या ८० आहे. पुणे शहरात ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ९९० असून जिल्ह्यात एक हजार ९७९ सक्रीय रूग्ण आहेत.गेल्या आठ दिवसात शहरातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या दीडशेंनी वाढली आहे.

<div class="paragraphs"><p>corona </p></div>
एक जानेवारी शौर्य दिवस; अभिवादनाला या पण गर्दी नको !

दरम्यान, सोमवारी दिवसातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात दिवसात १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य एका रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पिंपरी चिंचवडमधील आहे. दिवसात पुणे शहर, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

<div class="paragraphs"><p>corona </p></div>
नीतेश राणेंच्या विषयात खासदार राऊत म्हणाले; यावर मी बोलणं बरं नाही

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ८० रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ३८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २७, नगरपालिका हद्दीतील ८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पुणे शहरातील सर्वाधिक ७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी चिंचवडमधील २५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७०, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण १ हजार ९७९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार ४१४ हे गृहविलगीकरणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com