Rathi Case Pune : राठी हत्याकांडातील आरोपीला 28 वर्षांनंतर मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 'हे' आहे कारण

Pune Crime News : 1994 साली पुण्यातील राठी कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama

Pune News : 1990 च्या दशकात पुण्याला हादरून सोडणाऱ्या राठी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

ज्यावेळी हे हत्याकांड घडले त्यावेळी आरोपी अल्‍पवयीन होता, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवत आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत.

नारायण चेतनराम चौधरी असं या मुक्‍त करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव असून तो गेली 28 वर्ष तुरुंगात होता. पुण्यातील राठी कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 26 ऑगस्‍ट 1994 ला घडली होती. या राठी हत्याकांडाने पुणे हादरलं होतं.

Supreme Court
Congress News : कॉंग्रेसमधील ‘वन मॅन आर्मी’ची कसोटी, नाना पटोलेंच्या ‘त्या’आदेशाने भरली धडकी !

राठी हत्‍याकांडातील आरोपींना न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, चौधरी आणि त्याचा साथीदार गेहलोत या दोघांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यानंतर 2016 मध्ये राष्‍ट्रपतींनी गेहलोतच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्‍मठेपेच्या शिक्षेत केलं होतं.

पण चौधरीने आपला दयेचा अर्ज मागे घेत गुन्हा घडला तेव्हा आपण अल्पवयीन होतो, अशी पुनर्विचार याचिका न्यायालयाच दाखल केली होती. त्यानंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाला चौधरीच्या वयाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Supreme Court
Bawankule On Thackeray's Statement: माझं कूळ काढून त्यांनी माझा नव्हे, तर तमाम ओबीसींचा अपमान केला !

त्यानंतर चौधरीचा जन्‍म नोंदीचा पुरावा न्‍यायालयात सादर करण्‍यात आला होता. आता न्यायालयाने नारायण चौधरी हा गुन्‍ह्यावेळी अल्‍पवयीन असल्‍याचं निरीक्षण नोंदवलं. तसेच या आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com