तीन नाझरे धरणे भरतील इतके पाणी याच धरणातून एका रात्रीत वाहिले...

three times water flows from nazare dam`s capacity in a night
three times water flows from nazare dam`s capacity in a night

जेजुरी : क-हा नदीला पूर आल्याने सासवड ते बारामती पर्यंतच्या नदीकाठच्या गावांचे शेती,घरे व इतर नुकसान झाले आहे.बुधवारी मध्यरात्री क-हा नदीचा एक लाख क्युसेकने विसर्ग सुरु झाल्याने नदीच्या पात्राबाहेर पाणी आले.त्यामुळे नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले.नाझरेतून मध्यरात्री 85 हजार हजारापेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग झाल्याने धऱणाखाली गावांनाही पुराचा तडाखा बसला.

क-हा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेली चार दिवसापासून दररोज रात्रीचा पाऊस पडत आहे.बुधवारी रात्री आठ ते दहा या काळात कोडीत, गराडे, नारायणपूर परिसरात ढगफूटीसारखा पाऊस झाला.त्यानंतरही रात्रभर पाऊस सुरुच राहिला. त्यामुळे रात्री बाराच्या सुमारास क-हा नदीला पूर आला.

जेजुरी-सासवड रस्त्यावरील सासवड,बेलसर,कोथळे येथील पुलावरून पाणी वाहत होते.कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचे ढापे न काढल्याने पाण्याच्या वेगाने बाजुच्या शेतजमीनीचे नुकसान झाले.अनेक झाडे ढापांना अडकल्याने पाणी पात्र सोडून गावातून शेतातून शिरले. त्यामुळे शेती व घरांचे मोठे नुकसान झाले.

बेलसर येथे कोल्हापूर पध्दतीच्या दोन्ही बंधा-यांचे मोठे नुकसान झाले.बांधा-यांच्या बाजूची मातीचे बांध वाहून गेले.स्मशानभुमीचे नुकसान झाले. विहीरी बुडाल्या, मोटारी वाहुन गेल्या. साधारण बारा ते दोन वाजेपर्यंत बेलसर परिसरात नदीला उतार नव्हता. कोथळे येथील मातंग वस्ती परिसरातील पन्नास घरातून पुराचे पाणी शिरले. नागरिकांना वेळीच हलविल्याने दुर्घटना टळली.मात्र धान्य,कपडे,वस्तू पाण्यात वाहून गेले. येथील बंधा-याच्या वरुन पाणी वाहिल्याने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात पाणी शिरले. संरक्षक भिंत पडली. रात्रीची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली. कोथळे रानमळा परिसरातील नदीलगतच्या मोटारी पाण्यात बुडाल्या. नाझरे धरणातून मध्यरात्री एक वाजच्या सुमारास सुमारे 85 हजार ते एक लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. 26 स्वयंचलित दरवाज्यावरून दोन फुट पाणी वाहत होते. त्यामुळे धरणापुढील नाझरे, जवळार्जुन, आंबी परिसरातील नदीकाठच्या नागरीकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. अनेकांच्या घरातून पाणी शिरले.तर शेतीचे या परिसरात मोठे नुकसान झाले. जवळार्जुन, आंबी परिसरात कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-याचे ढापे न काढल्याने पाणी शेतातून शिरले.

दरम्यान सासवडचा पुलाचा परिसर खचल्याने हा रस्ता वाहुतकीसाठी बंद होता. बेलसर पुलावरूनही पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु ठेवली आहे. नाझरे धरणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धरणातुन पाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरीक नाझरे धरणाकडे गर्दी करीत आहेत.

धरणातून सर्वात मोठया विसर्गाची नोंद

तीन नाझरे धरण भरतील एवढा एका रात्रीत विसर्ग नाझरे धरणाच्या उभारणीनंतर पहिल्यांदा झाला. आतापर्यंत एका रात्रीत पाण्याचा एवढा विसर्ग होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात आले. तीन धरणे भरतील एवढा विसर्ग एका रात्रीत झाला. सासवड, गराडे, चांबळी, नारायणूर परिसरात रात्री आठपासून ढगफुटीसारखा पाऊस सुरु होता.त्यामुळे क-हा नदी रात्री अकरा नंतर एक लाख क्युसेक वेगाने वाहु लागली.त्यामुळे नाझरे धरणातून रात्री एक वाजता 26 दरवाज्यावरून दोन फुट उंच पाणी 85 हजार क्युसेक पेक्षा अधिक वेगाने पाणी विसर्ग झाले. नाझऱे धरणाची पाणीसाठवण क्षणता 788 दशलक्ष घनफुट एवढी आहे. एका रात्रीत सुमारे 2250 दशलक्ष घनफुट एवढे पाणी धरणातून वाहून गेले. धरण परिसरात 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com