वर्षा तापकीर यांना प्रितम मुंडे, भारती पवार, चित्रा वाघ यांच्या मानाच्या पंक्तीत स्थान

वर्षा तापकीरसलग तीन वेळा महापालिकेवर निवडून आल्या आहेत.
IMG-20210727-WA0026.jpg
IMG-20210727-WA0026.jpg
Published on
Updated on

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करत ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर (Varsha Tapkir) यांना खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde)  केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharti Pawar) , चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या पंक्तीत मानाचे स्थान देण्यात आले आहे. त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने पुण्यातील पक्षाच्या कोअर कमिटीच्या त्या सदस्य असतील, पुणे भाजपातील निर्णय प्रक्रियेत आता व तापकीर यांच्या शब्दालाही वजन प्राप्त होणार आहे.(Varsha Tapkir is in the ranks of Pritam Munde, Bharti Pawar and Chitra Wagh)

प्रदेश उपाध्यक्ष पदावर खासदार प्रितम मुई, खासदार भारती पवार, चित्रा वाघ व माधवी नाईक या दिग्गज महिला नेत्यांना स्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रातून वर्षा तापकीर यांनाही प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पक्षाने त्यांना पहिल्या रांगेत मानाचे स्थान दिले आहे. ही नियुक्ती करीत त्यांच्या अनुभवाचा सन्मान पक्षाने केल्याचे मानले जात आहे. मराठा समाजातून येणाऱ्या वर्षा तापकीर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवून पुण्यातील मराठा महिला नेतृत्वानाही बळ दिले आहे. पुण्यातील पक्षाच्या कोअर कमिटीत तापकीर यांचा सहभाग असल्याने पक्षातील निर्णयप्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग असणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांना पुणे शहर संघटनेतही महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे.

वर्षा तापकीर या  ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि सलग तीन वेळा महापालिकेवर निवडून आल्या आहेत. स्थायी समिती, शहर सुधारणा, महिला व बाल कल्याण या समित्यांमध्ये त्यांनी काम केलेले आहे. पुढील वर्षात येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत. अशावेळी कामकाजाचा व निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेल्या वर्षा तापकीर महत्त्वाची भूमिका राज्य पातळीवर बजावू शकतात. विशेषतः स्थानिक स्वराज यांच्या निवडणुकीत ५० टक्के महिलांना उमेदवारी दिली जाते. या महिला उमेदवारांचा महापालिकांत प्रभाव कसा राहू शकेल. निवडणुका प्रभावीपणे कशा लढता येतील याबाबत तापकीर मोलाची भूमिका बजावू शकतील अशी खात्री असल्यानेच त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

५० टक्के महिला मतदार समोर ठेवत ५० टक्के महिला प्रतिनिधी या दोनही आघाड्यांवर पकड निर्माण करण्यासाठी भाजपाच्या वतीने ठोस पावले टाकली जात असल्याचेही नियुक्ती निदर्शक मानली जात आहे.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com