वाघोलीच्या सरपंचपदी वसुंधरा उबाळे; ग्रामविकास पॅनेलला बहुमत

वाघोलीच्या सरपंचपदी वसुंधरा उबाळे; ग्रामविकास पॅनेलला बहुमत

वाघोली : वाघोली ग्रामपंचायत निवडणुकीत 17 पैकी ग्रामविकास पॅनलने नउ जागांवर विजय मिळविला. मात्र सरपंचद त्यांना गमवावे लागले. सरपंचपदी वाघेश्वर पॅनलच्या वसुंधरा उबाळे यांनी 50 मतांची आघाडी घेत ग्रामविकास पॅनलच्या मिना सातव यांचा पराभव केला. उबाळे यांना 8766 मते तर सातव यांना 8716 मते मिळाली.

सरपंचपदाच्या उमेदवार मीना सातव यांचा केवळ 50 मतानी पराभव झाल्याने त्यांचे पती व विद्यमान सदस्य संजय सातव यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. फेर मतमोजणीत वसुंधरा उबाळे याच 50 मतानी विजयी ठरल्या. वाघेश्वर पॅनलने सात जागांवर विजय मिळविला. कविता दळवी या विद्यमान सदस्या विजयी झाल्या तर मच्छींद्र सातव व स्वाती सातव हे विद्यमान सदस्य पराभुत झाले. अपक्ष उमेदवार श्रीकांत वाघमारे हा विजयी झाला. तर काळभैरवनाथ पॅनेलचा दारुण पराभव झाला. 

वाघेश्वर पॅनल, वाघोली ग्रामविकास पॅनल व काळभैरवनाथ पॅनल मध्ये लढत झाली. सरपंचपदासाठी वाघोली ग्रामविकास पॅनलच्या मीना सातव, वाघेश्वर पॅनलच्या वसुंधरा उबाळे व काळभैरवनाथ पॅनलच्या साधना व्यवहारे यांच्यात चुरस होती. पहील्या तीन वार्डमधील मतमोजणीत उबाळे यांनी 1400 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर उर्वरीत तीन वॅार्डमधील मतमोजणीत सातव यानी मतांची आघाडी तोडली. मात्र तरीही त्यांना 50 मतानी पराभुत व्हावे लागले. तिसर्या उमेदवार साधना व्यवहारे यांना केवळ 336 मते मिळाली.

माजी जिल्हा परीषद सदस्या अर्चना कटके या वॅर्डक्रमांक पाच मधुन विजयी झाल्या. तर विद्यमान सदस्य समीर भाडळे यांच्या पत्नी पूजा भाडळे क्रमांक एकमधुन तर माजी सरंपच रामदास दाभाडे यांच्या वहीनी वंदना दाभाडे क्रमांक दोन मधुन विजयी झाल्या. पोलिस पाटील पदाचा राजीनामा देउन निवडणुक लढविलेले रामकृष्ण सातव हे  क्रमांक तीन मधुन विजयी झाले. सदस्यामध्ये सर्वाधिक पुजा भाडळे यांना 2900 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार गणेश पवार यांना सर्वात कमी 41 मते मिळाली.

सर्वाधिक चुरस सरपंचपदासाठी व क्रमांक सहा मध्ये होती. सहामध्ये ग्रामविकास पॅनेलच्या तीन्ही उमेदवारांनी विजय मिळविला. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान सदस्या कविता दळवी व माजी सरपंच शिवदास उबाळे वगळता सर्व चेहरे ग्रामपंचायतीवर प्रथमच निवडुन आले आहेत. सरपंचपदी विजयी झालेल्या वसुंधरा उबाळे या हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती आहे. त्यांचे पती माजी सरपंच शिवदास उबाळे हे ही विजयी झाले.

काळभैरवनाथ पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार साधना व्यवहारे व त्यांचे पती दत्तात्रय व्यवहारे दोघही पराभूत झाले. वाघोलीत निकालापूर्वीच ग्रामविकास पॅनेलच्या मिनाकाकी सातव यांच्या विजयाचे होर्डींग लागले होते. मात्र ऐनवेळी वसुंधरा उबाळे या सरपंचपदी विजयी झाल्या तर मिनाकाकी सातव यांना 49 मतांनी पराभवास सामोरे जावे लागल्याने गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. 

विजयी उमेदवारांची नावे व त्यांची मते कंसात -- 
सरपंचपदी वसुंधरा शिवदास उबाळे. ( 8766 )

विजयी सदस्य- शिवदास मनोहर उबाळे ( 2503 ), पुजा समीर भाडळे ( 2900 ), महेंद्र परशुराम भाडळे ( 2567 ) विजय रामचंद्र भाडळे ( 1316 ), वंदना संजय दाभाडे ( 1381 ), रामकृष्ण हेमचंद्र सातव ( 2026 ), रेश्मा गणेश पाचारणे ( 2092 ), रेाहीणी सागर गेारे ( 2214 ), कविता सुधीर दळवी ( 1530 ), सुनिता अनिल सातव ( 1643 ), श्रीकांत भगवान वाघमारे ( 1189 ), मारुती भगवंता गाडे ( 1448 ), जयप्रकाश सुभाष सातव ( 1185 ), अर्चना शांताराम कटके ( 1350 ), संदीप सोमनाथ सातव ( 2160 ), मालती गणेश गोगावले ( 2273 ), जयश्री सुनिल काळे ( 1981 )
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com