`गुंड गवळीला काॅलर धऱून पकडला होता...त्यामुळे घाबरू नका!`

`गुंड गवळीला काॅलर धऱून पकडला होता...त्यामुळे घाबरू नका!`

कुख्यात गुंड अरुण गवळी याची वडगावपीर ही सासूरवाडी आहे. वडगावपीर व लोणी या दोन गावांमध्येअवघे चारकिलोमीटरचे अंतर आहे. वडगावपीर येथे गवळीचा बंगला आहे. त्याची पत्नी आशा गवळी यांचे वडगावपीर येथेनेहमी येणे जाणे असते. या टोळीकडून खंडणीचे प्रकार घडल्याने याबाबतच्या तक्रारीजिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांच्याकडे करण्यात आल्या. त्यांच्यासूचनेवरुनमंगळवारी ग्रामसभा झाली. या सभेतपोलिस निरिक्षक प्रकाश धस यांनी ग्रामस्थांना धीर दिला.

पारगाव : गवळी टोळीच्या नावाने खंडणी मागणारा गुन्हेगार कितीही मोठा असला तरी पोलिस त्याची गय करणार नाही. या गवळी टोळीच्या पुणे जिल्ह्यातील  प्रत्येक गुन्ह्याची पारदर्शक निःपक्षपातीपणे चौकशी करुन कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली.

लोणी गावातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये दैनंदिन व्यवहार बंद ठेवू नयेत. खुद्द  गुंड अरुण गवळीला पोलिसांनी काॅलरला धरून पकडला होता. त्यामुळे त्याच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांना घाबरू नका, असे आवाहन मंचरचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी केले. 

लोणी (ता. आंबेगाव) येथील व्यापाऱयाला गवळी टोळीतील गुन्हेगारांनी ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागीतली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असुन तशाच स्वरुपाची याच गावातुन अजुन एक फिर्याद दाखल झाली असुन 11 संशियतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे या घटनांमुळे लोणी परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गवळी टोळीच्या दहशतीचा निषेध करण्यासाठी व गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी आज लोणी गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला होता. सर्व ग्रामस्थ मूक मोर्चाने महादेव मंदिरामध्ये आल्यानंतर ग्रामसभेला सुरवात झाली.

या वेळी बोलताना प्रकाश धस म्हणाले,``गुन्हेगारांना मोठे करण्यास आपण कारणीभूत असुन निव्वळ कोणाचे नाव वापरुन कोण दहशत निर्माण करत असेल तर अजिबात घाबरु नका. ज्यांना त्रास झाला असेल त्यांनी निःसंकोच पुढे यावे. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. येथील दोन्हीही फिर्यादींना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.``

गुन्हेगार कितीही मोठा असला तरी तो स्वतःच्या जीवाला खूप घाबरत असतो, हे धस यांनी या प्रसंगी सांगितले.  अरुण गवळी 1992 मध्ये येरवडा जेलमध्ये होता. त्याला जामीन मिळण्याची शक्यता असल्याने त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी 
मुबंई क्राईम ब्रॅंच क्रमांक 4 चे पथक सुमारे एक महीना येरवडा जेलच्या बाहेर तळ ठोकून होते. त्या पथकात मी होतो. गवळीला जामीन मिळूनही तो एन्काटरच्या भीतीने बाहेर येत नव्हता. वकिलांनी समजावल्यानंतर तो बाहेर आला व पळतच कारमध्ये जाऊन बसला. त्याची कार मुबंईच्या दिशेने निघा.ली आम्ही पोलिस गाडी कारला आडवी लावली. गवळी जिवाच्या भीतीने कारच्या दोन्ही सीटमध्ये असलेल्या जागेत लपला होता. त्याच्या कॉलरला धरुन बाहेर काढून त्याला अटक केली, असा किस्सा त्यांनी सांगितला. 

दरम्यान लोणी येथील कापड व ड्राय फूडच्या व्यापाऱ्या कडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गवळी टोळीच्या तीन जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात मम्मी उर्फ आशा गवळी यांचेही नाव आले होते. त्यामुळे आशा गवळी यांनी राजगुरुनगरच्या सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यांना अटकपूर्व अंतरिम जामीन बुधवार (ता. 2 मे) पर्यंत न्यायालयाकडून मंजूर झाला आहे. याबाबतचे पत्र मंगळवारी (ता. 24 ) मंचर पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आशा गवळी यांच्यावर होणारी पोलीस कारवाई तूर्त टळली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com