...जेव्हा विश्वजित कदम हे वर्षा गायकवाड यांना स्वत:चा बूट देतात आणि अनवाणी चालतात...! 

...जेव्हा विश्वजित कदम हे वर्षा गायकवाड यांना स्वत:चा बूट देतात आणि अनवाणी चालतात...! 

मुंबई : कॉंग्रेस पक्षात गटातटाचे राजकारण नेहमीच पाहायला मिळालं. पण मुंबईत आज आंदोलन दरम्यान एक वेगळं चित्र दिसत होत. आमदार वर्षा गायकवाड यांची चप्पल रस्त्यात तुटली तेव्हा तत्काळ कॉंग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी आपला पायातील बूट वर्षा गायकवाड यांना काढून दिला आणि ते अनवाणी पायांनी चालत होते. 

ऑगस्ट क्रांती मैदानहुन कॉंग्रेसचा तिरंगा मार्च सुरू झाला. या मार्चमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह कार्टकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषत: कॉंग्रेसचे जे तरूण आमदार आहेत त्यामध्ये विश्वजित कदम, वर्षा गायकवाड, प्रणोती शिंदे हे ही मोठ्या उत्साहाने या मार्चमध्ये होते.

स्वत: विश्वजित घोषणा देण्यावर आघाडीवर होते. हे आमदार चालत असताना माजी मंत्री आणि विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांची अचानक चप्पल तुटली. त्यामुळे तुटलेली चप्पल घालून चालणे अवघड होऊन गेले. ही गोष्ट जेव्हा विश्‍वजित यांच्या लक्षात आली तेव्हा मात्र त्यांनी आपल्या पायातील बूट गायकवाड यांना दिला आणि स्वत: अनवाणी चालू लागले. 

कॉंग्रेसचे नेते एकत्र,एकमेकांना सहकार्य करत असल्याचे वेगळे चित्र आज या निमित्ताने पाहायला मिळालं.... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com