`माळेगावा`त राष्ट्रवादीची घोडदौड जोरात : पणदरेच्या तीनही जागांवर विजय

`माळेगावा`त राष्ट्रवादीची घोडदौड जोरात : पणदरेच्या तीनही जागांवर विजय

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत रात्री अकरापर्यंत 21 पैकी सात जागांचे निकाल जाहीर झाले. या सातपैकी सहा जागा जिंकून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नीलकंठेश्वर पॅनेलने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. सोसायटी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने जिंकली आहे. 

रात्री उशिरा जाहीर झालेल्या पणदरे गटात राष्ट्रवादीचे तीनही संचालक निवडून आले. 

पणदरे गट 
तानाजी काका  कोकरे 5580 
केशवराव जगताप 5493
योगेश जगताप 5058 (तिघेही विजयी राष्ट्रवादी)

शशिकांत कोकरे 5046
अरविद जगताप 4865
रोहित जगताप 4836 (तिघेही सहकार बचाव पॅनेल)

ही आकडेवारी अंतिम नसून ती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनल पनदरे गटामध्ये यावेळी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. माजी उपाध्यक्ष तानाजी कोकरे, मातब्बर उमेदवार केशव जगताप व बारामतीचे माजी नगराध्यक्ष योगेश जगताप या अनुभवी लोकांना या गटातून उतरवले होते. या गटाची मतमोजणी अकरा वाजता संपली. यामध्ये राष्ट्रवादीचे तानाजी कोकरे (5580), केशवराव जगताप (5493) योगेश जगताप हे तिन्ही उमेदवार निवडून आले. 

मात्र कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सहकार बचाव पॅनलचे शशिकांत कोकरे यांनी 5046 मते मिळवून जगताप यांना कडवी लढत दिली. राष्ट्रवादीकडून सहकार बचावकडे आलेल्या अरविंद जगताप (4865) यांचा व रोहित जगताप (4836) यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. या गटात क्रॉस वोटिंगच्या प्रमाणात काहीशी घट झाल्याचा राष्ट्रवादीला फायदा झाला. आधी एकतर्फी वाटणारी या गटातील लढत शशिकांत कोकरे या सत्तरीच्या कार्यकर्त्याच्या लढतीमुळे लक्षात राहण्यासारखी ठरली.

  ..........

गट नंबर 1 ( माळेगांव)
संग्राम काटे ( सहकार बचाव )  :- 5577
संजय काटे ( राष्ट्रवादी ) :- 5744 विजयी.
बाळासाहेब भाऊ तावरे,( राष्ट्रवादी ) :- 6184 विजयी
रंजन काका तावरे  ( सहकार बचाव ) :- 6411 विजयी 
 पोपटराव बुरुंगले ( राष्ट्रवादी ) :- 5603
स्वरुप वाघमोडे ( सहकार बचाव ) :-5399

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com