करमाडजवळ रेल्वे मालगाडीने १९ मजुरांना चिरडले; १४ ठार

हे १९ जण रेल्वे रुळावरच झोपी गेले. मात्र, शुक्रवारीपहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले.
aurangabad karmad malgdi accident news
aurangabad karmad malgdi accident news

करमाड: शुक्रवारी  पहाटेच साडेपाचच्या सुमारास औरंगाबादहुन  जवळच असलेल्या करमाड बदनापूर रेल्वे मार्गावर मालगाडीने १४ मजुरांना चिरडल्याची खळबळजनक घटना घडली. हे सगळे मजूर जागीच ठार झाले असून, पाच गंभीर जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सटाणा शिवाररात हा भीषण दुर्दैवी अपघात झाला. 

जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाले होते. रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. 

सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, रेल्वेने मालवाहतूक काही प्रमाणात सुरू केली आहे. गुरुवारी (ता. ७) रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रात्रीच औरंगाबादकडे पायी निघाले. 

बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून हे १९ जण रेल्वे रुळावरच  झोपी गेले. मात्र, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले.

जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येऊन रेल्वे रुग्णवाहिकाही निघाल्याचे वृत्त आहे. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे पाोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com