अकोला     :भारिप-बहुजन महासंघ टाकणार महापौरांच्या घराला घेराव 

akola-mahapalika
akola-mahapalika

अकोला     : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढीचा मुद्दा पेटला आहे. या करवाढीला तीव्र विरोध करणार्या भारिप-बमसंकडून आता करवाढीचा ठरावच रद्द करण्याच्या मागणीसाठी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या घराला शुक्रवारी  (ता. 18 ) घेराव घालण्याचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

अकोला महापालिकेत सत्ताधारी भाजपने 3 एप्रिलच्या सभेत  अवाजवी करवाढ केली आहे. ही करवाढ अन्यायकारक असुन भाजपने अकोलेकरांच्या खिशाला कात्री लावल्याचा आरोप करीत या करवाढीच्या विरोधात भारीप बहुजन महासंघ सतत आंदोलन करुन विरोध करीत आहे. 

करवाढीच्या निर्णयाला जनतेचा वाढता विरोधामुळे महापौर विजय अग्रवाल यांनी 3 जुन  रोजी पत्रकार परिषद घेवून दहा टक्के करवाढ मागे घेण्यात येईल अशी घोषणा केली होती . त्यानंतर करवाढीवर अनेक  आरोप व प्रत्याआरोप भारीप बहुजन महासंघ व महापौर यांच्यामध्ये झालेत. आता महापौरांनी  19 आँगस्ट रोजी महासभा काढली असुन यासभेत मालमत्ता करवाढीमध्ये फेरविचार करण्याचा विषय घेण्यात आला आहे. 

मात्र करवाढीचा फेरविचार न करता  3 एप्रिल 2017 च्या महासभेतील ठराव रद्दच करावा आणि मागील वित्तीय कर प्रणालीनुसार कर वसुली करावी या मागणीसाठी भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारिप बमसंने पुन्हा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. 

 त्यानुसार  मनपातील गटनेता अँड. धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, नगरसेवक बबलू जगताप, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, माजी नगरसेवक गजानन गवई, मनोहर पंजवाणी, आशिष तिवारी, अँड. संतोष राहाटे, डाँ. राजकुमार रंगारी, झोन समितीचे रामाभाऊ तायडे, बुध्दरत्न इंगोले विरोध करीत आहेत . 

तसेच  प्रा. प्रसन्नजीत गवई, वंदना वासणिक, प्रतिभा अवचार, अरुंधती शिरसाट, मंतोषी मोहोड, सुवर्णा जाधव, सुनिता गजघाटे, प्रभा शिरसाट, मंगला घाटोरे, प्रवीण पातोंड, पराग गवई यांच्यासह  कार्यकर्ते शुक्रवारी  ( ता. 18) रोजी महापौर विजय अग्रवाल व भाजपच्या नगरसेवकांच्या घराला घेराव घालणार आहेत. यावेळी भाजपच्या नगरसेवकांना  अवाजवी करवाढ रद्द करण्याच्या मागणीचे पत्र देणार असल्याचे गटनेत्या अँड. धनश्री देव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com