अण्णा आज उपोषण सोडणार ?

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल व लोकायुक्त यांच्या नेमणुका कराव्यात व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सातवा दिवास आहे.
अण्णा आज उपोषण सोडणार ?

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल व लोकायुक्त यांच्या नेमणुका कराव्यात व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सातवा दिवास आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व जलसंपदा मंत्री  गिरीष महाजन आज दुपारी एक वाजता हजारे यांच्या भेटीसाठी येणार आहेत.

मुख्यमंत्री व केंद्रीय कृषिमंत्री यांच्यासह इतरही मंत्री येणार असल्याने बंदोबस्तात मोठी  वाढ करण्यात आली आहे. मंत्रिगण आज आल्यानंतर हजारे यांच्या समवेत चर्चा होणार आहे. त्यानंतर ग्रामसभा  होईल व त्यानंतर  उपोषण सुटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. 

आज हजारे यांचे वजन पाच  किलो  शंभर  ग्रॅम  घटले असून, थकवाही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एम. मुराबीकर यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com