भुमरेंच्या गावांत सख्या मामांच्या मुलांनीच थोपटले दंड; भाजप, राष्ट्रवादीचाही जोर..

राजकारणात नेता कितीही मोठ्या पदावर गेला तरी त्याला आपल्या गावगाड्यावरील पकड ढिली झालेली कदापी सहन होत नाही. भुमरे यांच्या बाबतीत देखील तेच आहे. ज्या ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्री गणेशा केला ती गावची ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी भुमरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन पाचोडची ग्रामपंचायत त्यांच्याच ताब्यात आहे.
Minister sndipan bhumre villege grampanvhyat news
Minister sndipan bhumre villege grampanvhyat news

पैठण ः राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या पाचोड (बुद्रुक) या गावच्या ग्रामपंचायतीसाठी त्यांचे विरोधक एकवटले आहेत. भाजप, राष्ट्रवादीसह भुमरे यांच्या सख्या मामांच्या मुलांनी देखील त्यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक काळ या ग्रामपंचयात व संरपचपदावर भुमरे कुटुंबिय किंवा त्यांच्या विश्वासू व्यक्तीचेच वर्चस्व राहिलेले आहे. राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री, नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी निधीची घोषणा केली आहे. पण केबिनेट मंत्री असलेल्या भुमरे यांना आपलीच ग्रामपंचायत पुन्ह ताब्यात घेण्यासाठी विरोधकांशी दोन हात करावेच लागणार असे दिसते.

पैठण विधानसभा मतदार संघातील पाचोड ग्रामपंचायतीत एकुण १७ सदस्य आहेत. पाचोड(  बुद्रुक) हे गाव  शिवसेना आमदार तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान यांचे मुळगाव. भुमरे यांच्या राजकीय प्रवासाला याच ग्रामपंचायती पासुन सुरुवात झाली. या ग्रामपंचायती मध्ये भुमरे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडुन आले होते. नंतर त्यांनी  पंचायत समितीची निवडणूक लढविली व पंचायत समिती सदस्य म्हणून ही ते निवडुन आले. पंचायत समिती निवडणुकीत निवडुन आल्यामुळे  त्यांना परत कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या  पंचायत समितीत उपसभापती पदाची संधी देखील मिळाली. कॉग्रेस पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे ते उपसभापती देखील झाले होते. त्यानंतर पाचवेळा आमदार आणि आता सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना स्थान देण्यात आले आहे.

राजकारणात नेता कितीही मोठ्या पदावर गेला तरी त्याला आपल्या गावगाड्यावरील पकड ढिली झालेली कदापी सहन होत नाही. भुमरे यांच्या बाबतीत देखील तेच आहे. ज्या ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्री गणेशा केला ती गावची ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी भुमरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन पाचोडची ग्रामपंचायत त्यांच्याच ताब्यात आहे.  या काळात सरपंच पदासाठी जे आरक्षण जाहीर होईल त्यानूसार पक्षातील कार्यकर्त्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवून भुमरे यांनी सुत्रे मात्र आपल्याच हाती ठेवली. तर परिस्थीतीनूसार कधी सरपंच पदावर  तर कधी उपसरपंच पदावर घरातील व्यक्ती किंवा मर्जीतील माणसाला त्यांनी नेमले.

पंचवीस वर्षाच्या कारकीर्दीत आतापर्यंत ग्रामपंचायतीत मोठा कार्यकाळ भुमरे यांचाच राहिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यात भुमरे कॅबिनेट मंत्री असतांना होणारी पाचोड ग्रामपंचायतीची निवडणूक अधिकच रंजक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे व भुमरे यांच्या सख्या मामाची मुलं रणजित नरवडे व रणवीर नरवडे हे मैदानात उतरले आहेत. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास शेळके यांनी देखील भुमरेंच्या विरोधात पॅनल उतरवण्याची तयारी केली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे यांनी ही या निवडणुकीत नेत्यांच्या सांगण्यावरून विशेष लक्ष घातले आहे.तर भुमरे यांच्या विरोधात विधानसभा लढवलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांनी देखील पाचोड ग्रामपंचायतीत विशेष रस दाखवला आहे. त्यामुळे भुमरे विरुध्द इतर सगळे पक्ष असे चित्र सध्या तरी पाचोड ग्रामपंचायतीत दिसत आहे.

Edited By : Jagdish Pansare 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com