केडीएमसीला ठेकेदाराने लावला कोट्यावधींचा चूना..

फसवणूक केल्याप्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी महापालिकेच्या वतीने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Kalyan-Dombiwali Municipal Corporation News
Kalyan-Dombiwali Municipal Corporation News

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेला एका ठेकेदाराने 20 कोटींपेक्षा जास्तीचा चुना लावल्याचे उघड झाले आहे. केडीएमसीचे 20 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Billions of Fraud by contractor to KDMC) मॅथ्यू जॉन कुचिन, अनिल चंदूलाल शहा आणि मेसर्सचे संचालक सीमा अनिल शाह असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेने सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या उद्देशाने 2005 साली सुरु केलेल्या बीओटी प्रकल्पाचा बोजवारा उडाला असून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला आहे. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पाचा नागरिकांना लाभ झालेला नाही. (Kalyan Dombiwali Muncipal Corportaion)

त्यातच एक असलेल्या ट्रक टर्मिनस आणि पार्किंग प्लाझा या प्रकल्पासाठी खोट्या कागदपत्राच्या आधारे आरक्षित जागेचा गैरवापर करत या प्रकल्पासाठी करोडो रुपयाचे कर्ज घेऊन पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप करत संबधित कंत्राटदाराविरोधात पालिका प्रशासनाने खडकपाडा  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पालिकेचे 20 कोटी 69 लाख रुपयाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत ठेकेदार एसएस असोसीएटसचे संचालक मथ्यू जॉन कुचीन, अनिल शहा आणि सीमा शहा यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधा वापरा हस्तांतरित करा अर्थात बीओटी तत्वावर 2005 साली कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनेत दुर्गामाता चौक येथे ट्रक टर्मिनस व पार्किंग प्लाझा, वाडेघर येथे स्पोर्ट्स क्लब, विट्ठलवाडी पूर्वेकडे व्यापारी संकुल आणि भाजी मंडई, लालचौकी येथे कम्युनिटी सेंटर, डोंबिवली क्रीडागणावर बांधण्यात आलेला मॉल, आधारवाडी येथे मॉल कम मल्टिप्लेक्स प्रकल्प, रूक्मिणीबाई रुग्णालयाशेजारी मॉल यासारख्या बहुद्देशीय प्रकल्पाचा समावेश होता.

मोक्याचे भुखंड लाटले..

हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबधित ठेकेदारांना 36 महीन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र या सर्वच प्रकल्पाचा बोजवारा उडाला असून अद्यापी एकही प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही. मोक्याच्या भूखंडाची मलई ठेकेदार मागील 16 वर्षापासून लाटत आहेत.

कल्याण पश्चिमेकडील दुर्गामाता चौकात प्रस्तावित करण्यात आलेल्या ट्रक टर्मिनस आणि पार्किंग प्लाझासाठी पालिकेचा आरक्षित भूखंड ठेकेदाराला 20 वर्षांच्या लीज करारावर देण्यात आला होता. त्यानंतर महासभेची रीतसर परवानगी न घेताच तत्कालीन अधिकाऱ्यांनी या लीजची मुदत 60 वर्षे पर्यत वाढवली.

मात्र याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले होते. ठेकेदराकडून हा भूखंड खोट्या कागदपत्राच्या आधारे ताब्यात घेत पालिकेची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. संबधित संचालकांनी एस. एस. असोसीएटस या दोन संस्थाच्या नावातील साधर्म्यचा फायदा घेत नियमबाह्य करारनामे करत या प्रकल्पाच्या जागेवर कर्ज घेत या जागेवर थर्ड पार्टी हक्क निर्माण केला.

तर पालिकेचे 20 कोटी 69 लाख 69 हजार 585 इतके भाडे थकवले आहे. इतकेच नव्हे तर केडीएमसी विरोधातच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पालिकेची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी महापालिकेच्या वतीने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com