अशोक चव्हाण जिथे असतील तिथे पराभव निश्‍चित - आमदार चिखलीकर

अशोक चव्हाण जिथे असतील तिथे पराभव निश्‍चित - आमदार चिखलीकर

लोहा : कार्यकर्त्यांनो लोहा-कंधारची जिम्मेदारी स्वीकारा मी जिल्ह्यातील विरोधकांनी घाम फोडतो. लोकसभा असो की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, अशोक चव्हाण कुठे गेले की पराभव निश्‍चित असतो. लोकसभेची ही रंगीत तालीम आहे. येणारा काळ आमचा असेल असे उद्‌गार विजयी सभेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 

लोहा नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजप या दोन पक्षात अटीतटीची लढत झाली. कॉंगेसचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरूद्ध भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारात एकमेकाविरूद्ध दंड थोपटले होते. भाजपच्या माध्यमातून निवडणुकीचे शिलेदार होते आमदार प्रताप पाटील चिखलीकर. 
प्रचार सभेत बोलतांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, अशोकराव प्रचारसभेत झोपत होते. आता खुशाल झोपा म्हणावं. भाजप तुम्हाला आता जागे होऊ देणार नाही. माझ्यासोबत दलित बांधव आहेत. माझ्याकडे कधीच जातीयवाद नाही व नव्हता. प्रचारात आमची आवकात काढली. विजयाचे शिल्पकार माझे कार्यकर्ते आहेत. निवडणुक कुठल्या चिन्हावर हा मुद्दा महत्वाचा नाही. खंबीर नेतृत्व मुख्यमंत्र्यांचे आहे. आगामी काळात वचननाम्याप्रमाणे शादीखाना, बुद्धविहार, कामे होतील. आम्ही विरोधकांना अस्वस्थ करतो. लोकसभा असो की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अशोक चव्हाण जिथे कुठे गेले की पराभव निश्‍चित असतो. लोकसभेची ही रंगीत तालीम आहे. येणारा काळ आमचा असेल. लोकसभेच्या निवडणूकीसाठी नांदेड जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असेल. कार्यकर्त्यांनो लोहा-कंधारची जिम्नेदारी स्वीकारा मी जिल्ह्यातील विरोधकांनी घाम फोडतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com