कर्नाटकातील निकालापासून काॅग्रेसने धडा घ्यावा : आंबेडकर

कर्नाटकातील निकालापासून काॅग्रेसने धडा घ्यावा : आंबेडकर

पुणे : "भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कधीही जाणार नाही आणि त्यांची साथ देणाऱ्या रामदास आठवले यांनाही कधी साथ देणार नाही, असे स्पष्ट करत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काॅंग्रेसलाही खडे बोल सुनावले. 

कर्नाटकातील निवडणूका निकालावर ते बोलत होते. कर्नाटकमध्ये जनतेने कॉंग्रेसच्या विरोधात कौल दिला असून, कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आंबेडकर म्हणाले, "कर्नाटकातील निकाल पाहिला तर गुजरातमध्ये जो कॉंग्रेस विरोधातला कौल दिसून आला. तो कर्नाटकमध्येही दिसून आला. पण, यातून कॉंग्रेसने कोणताही धडा घेतलेला नाही. महाराष्ट्रात संविधान आणि लोकशाही वाचावी यासाठी, आम्ही राजकारणात प्रस्थापित नसलेल्या संघटनांची साथ देत आहोत. दुसरीकडे इथला बहुजन समाज आणि मुस्लिम समाज संविधान, आरक्षण आणि लोकशाही वाचावी म्हणून कॉंग्रेसच्या पाठीमागे उभा राहिला. पण, कॉंग्रेसने डोळेझाक केली. कॉंग्रेसला त्यांचे महत्त्व कळलेले नाही. त्यांनी आत्मपरिक्षण करावे.'' 

"प्रस्थापित पक्षांनी आम्हाला गृहित धरले होते. आम्ही त्यांना सोडून जाणार नाही असे त्यांना वाटते. पण, ते राज्यघटनाविरोधी आणि धर्मवादी आहेत. अशा पक्षांबरोबर आम्ही कधीही जाणार नाही. आम्ही एक ताकद बनून त्यांना नियंत्रित करण्याचे काम करणार आहोत. आम्ही तुमच्यावर एवढे दिवस अवलंबून राहिलो. आम्हाला तुम्ही वारंवार दुर्लक्षित केले. आता आम्ही सत्तेवर येऊन धर्मवादी संघटना आणि राज्य घटना विरोधी संघटनांवर नियंत्रित आणणार आहोत`,` असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com