पराभूतांना मंत्रीपदे नकोत,सोनिया गांधींना पत्र 

विधानसभा निवडणुकात पराभूत झालेल्या उमेदवारांकडून मंत्री मंडळात वर्णी लागावी यासाठी लॉबिंग सुरु करण्यात आली आहे. हा प्रकार दुःखदायक आणि दुर्दैवी असून या प्रकारामुळे कॉग्रेसमधील फार मोठा गट नाराजआहे. -प्रकाश सोनवणे
do not include losers in cabinet , sonawane writes to  Sonia-Gandhi
do not include losers in cabinet , sonawane writes to Sonia-Gandhi

मुंबई  : राज्यात महिनाभरापूर्वी महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांच्या दोन दोन मंत्र्यांनी शपथविधीही उरकून घेतला. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होताना विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना मंत्रीपदे देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रा. प्रकाश सोनवणे यांनी केली आहे . 


पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, मा. अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून सोनवणे यांनी ही मागणी  केली आहे. शिवसेना पक्षातूनही पराभूतांना मंत्रीपदे नको अशी मागणी आधीपासून जोर धरत होती. आता शिवसेनेच्या पाठोपाठ कॉग्रेसमध्येही मागणी जोर धरू लागली आहे.


राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन महिना होत आला आहे. मात्र अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षातील मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांची नावे पुढे आली आहेत. मात्र कॉग्रेस पक्षाकडून मंत्री पदासाठी कोण असणार हे दिल्ली दरबारी ठरणार असल्याने मंत्री मंडळाचा विस्तार लांबल्याने समजते.

 अशातच कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रा. प्रकाश सोनावणे यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून कळविले आहे, मंत्री मंडळात कॉंग्रेसकडे अनेक मातब्बर आहेत. मात्र विधानसभा निवडणुकात पराभूत झालेल्या उमेदवारांकडून मंत्री मंडळात वर्णी लागावी यासाठी लॉबिंग सुरु करण्यात आली आहे. हा प्रकार दुःखदायक  आणि दुर्दैवी असून या प्रकारामुळे कॉग्रेसमधील फार मोठा गट नाराज असल्याचे सोनावणे यांनी सांगितले. अशा लोकांना प्रमोशन देऊन पक्षाची प्रतिमा खराब होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.


राज्यात कॉंग्रेस पक्षाकडे अनुभवी आणि ज्ञानी लोकांचा भरणा मोठा आहे. पक्षाने अशा अनुभवी लोकांना दुर ठेवले होते. अशा लोकांना आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली तर याचा फायदा कॉंग्रेस पक्षालाच होणार आहे. अशा लोकांमुळेच कॉंग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचेन आणि पक्षाची ताकद वाढेल, असेही सोनावणे यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com