Bombay High Court Bench Aurangabad News
Bombay High Court Bench Aurangabad News

माजी मंत्री बबनराव लोणीकरांची खंडपीठात माघार..

खंडपीठाने याचिकाकर्ते बबनराव लोणीकर यांना दोन लाख रूपये भरण्याचे आदेशित केले. परंतु लोणीकर यांनी सदरील रक्कम न्यायालयामध्ये जमा केली नाही.

औरंगाबाद :  माजी मंत्री बबनराव बबनराव लोणीकर यांच्या याचिकेत परतूर येथून बांधकाम विभागाचे कार्यालय जालन्याला हलविण्याच्या सरकारी निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती राजेश लड्डा नकार दिला. (Former Minister Babanrao Lonikar withdraws from the bench.)

याचिकेनूसार सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ जालना हा विभाग २०१५ पर्यंत जालना येथे कार्यरत होता. (Ex. Minister Mla Babanrao Lonikar) याचे मुख्य कार्यालय हे जालन्याला होते. परंतु २०१४ च्या शासन बदलानंतर २७ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. दोन चे मुख्यालय जालना येथून परतूर येथे हलवले.

या शासन निर्णयाच्या विरुद्ध सदरील मुख्यालय हे जालना येथून स्थलांतरित करू नये यासाठी निरनिराळ्या व्यक्ती, पक्ष व संघटनांकडून अनेक अर्ज देण्यात आले होते. (Bmbay High Court Bench Aurangabad) परंतु शासनाने या सर्व अर्जांचा कुठलाही विचार न करता मुख्यालय परतूर येथे स्थलांतरित केले. त्या विरोधात अशोक दादाराव खापे व इतर यांनी खंडपीठात २०१५ मध्ये आव्हान दिले होते.

खंडपीठाने हा निर्णय केवळ शासनाच्या अखत्यारीत असून, ही प्रशासकीय बाब आहे, असे कारण सांगून हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सदरील मुख्यालयाचा कारभार हा आजपर्यंत परतूर येथूनच चालत होता. दरम्यान महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर २५ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार मुख्यालय हे पूर्ववत जालना येथे हलविण्यात आले. या नाराजीने तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली, तसेच हे कार्यालय परतूर येथेच असावे व जालना येथे हलवू नये अशी विनंती केली.

महाविकास आघाडी सरकारने निर्णय बदलला..

सदरील याचिकेत अशोक खापे यांनी ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल केला. व पूर्वी झालेल्या न्यायालयीन निर्णयाची प्रत व २०१५ मध्ये हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला होता हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खंडपीठाने याचिकाकर्ते बबनराव लोणीकर यांना दोन लाख रूपये भरण्याचे आदेशित केले. परंतु लोणीकर यांनी सदरील रक्कम न्यायालयामध्ये जमा केली नाही.

दरम्यान ॲड. संभाजी टोपे यांनी हे मुख्यालय जालना वरून परतूरला स्थलांतर करण्याचा जो निर्णय घेतला होता, त्यामध्ये सुद्धा न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. हे निदर्शनास आणून देत,  खंडपीठाने सदर प्रकरणात हस्तक्षेप करू नये अशी विनंती केली.

खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून घेत कुठल्याही प्रकारचा आदेश याचिकाकर्ते बबनराव लोणीकर यांच्या बाजूने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच दोन लाख रुपये आदेशित केल्याप्रमाणे भरले नसल्याबद्दल ते सुद्धा अवगत केले. त्यामुळे वादी बबनराव लोणीकर यांचे विधिज्ञ अमरजीतसिंग गिरासे यांनी १९ जुलै २०२१ रोजीच्या सुनावणी मध्ये सदरील जनहित याचिका खंडपीठातून माघारी घेण्याची विनंती केली. ती खंडपीठाने मान्य केली व सदर याचिका फेटाळली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com