कॉंग्रेस,राष्ट्रवादी विरोधी पक्ष नव्हे तर  भाजपचे साथीदार -  मंत्री गुलाबराव पाटील 

कॉंग्रेस,राष्ट्रवादी विरोधी पक्ष नव्हे तर  भाजपचे साथीदार -  मंत्री गुलाबराव पाटील 

जळगाव   :"  राज्यातील भाजपच्या सरकार विरोधात एवढे प्रश्‍न आहेत की आम्ही सत्तेत असतांनाही त्याविरूध्द रान उठवतोय. परंतु कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पळ काढत आहेत. हे कसले विरोधी पक्ष आहेत ? ते तर सत्ताधारी भाजपचे साथीदार आहेत," असा टोला राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. जळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 

शिवसेनेने भाजपच्या भ्रष्ट मंत्र्याविरूध्द "घोटाळेबाज'पुस्तिका प्रकाशित केली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेत शिवसेनेने आमची "कॉपी'केली असल्याचे म्हटले आहे. 

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, " कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेवर टिका करू नये, त्यांची विरोधी पक्ष म्हणून पात्रताच नाही. राज्यात भाजप सरकारविरूध्द एवढे प्रश्‍न आहेत, त्या विरोधात आम्ही राज्य डोक्‍यावर घेवून दणदणाट केला असता. मात्र दोन्ही पक्षाचे नेते भाजपशी संधान बांधून आहेत."

" दोन्ही पक्षाचे नेते भाजपकडेच असतात. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तर भाजपसोबतच असतात. तर भाजपच्या नेत्यांना बारामतीत जेवण दिले जाते.त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांशी संधान बांधून आहेत. "
जिल्ह्याचे स्थानिक राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकरांवरही त्यानीं टिका केली ते म्हणाले," देवकर दिवसा राष्ट्रवादीत असतात परंतु सायकांळी कोणत्या पक्षाच्या नेत्यासोबत असतांत हे त्यांनीच सांगावे. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेच्या विरोधात बोलू नये ."

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याकडे लक्ष देत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, दादा हे चांगले व्यक्ती आहेत. क्रमांक दोनचे मंत्री आहेत. त्यांना कामाचा व्याप निश्‍चित जास्त आहे. परंतु त्यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे असे अवाहनही त्यांनी केले. 


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी पोर्टलवर गायब झाल्याबाबत ते म्हणाले,  "कर्जमाफीच्या यादीबाबत "गोधंळ'झाल्याचे मान्य करून ते म्हणाले, लवकरच ती यादी पोर्टलवर जाहिर करण्यात येईल. मुख्यमंत्री कर्जमाफी करण्याबाबत प्रामाणिक असून ती शेतकऱ्यांना निश्‍चित कर्जमाफी मिळेल " . 
 

शिवसेना महानगर पदाधिकारी जाहीर 
जळगाव जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी घोषणा केली, 
महानगरप्रमुख- शरद तायडे, शहर प्रमुख- गणेश सोनवणे, कुलभूषण पाटील, शहर संघटक-दिनेश जगताप, उपजिल्हाप्रमुख-रोहिदास पाटील (चाळीसगाव विधानसभा), विधानसभा क्षेत्रप्रमुख- भिमराव खलाणे (चाळीसगाव विधानसभा), चाळीसगाव तालुका प्रमुख-रमेश चव्हाण, चाळीगाव तालुका संघटक- काशिनाथ गायकवाड, अमळनेर तालुका प्रमुख- विजय पाटील, अमळनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख - किरण पवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com