राज्‍यभरात अडकलेल्या पैठणकरांसाठी रोहयो मंत्री भुमरेंकडून मदतीचा हात

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण मतदारसंघातील एकही व्यक्ती राज्यात कुठेही असला तर त्याचा शोध घेऊन त्याच्या पर्यंत सर्व प्रकारची मदत पोहचवण्याचे आदेशच युवा प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांना दिले असून भुमरे स्वःता या कामावर लक्ष ठेवून आहेत.
sndeepan bhumre and his son help pepole
sndeepan bhumre and his son help pepole

पैठणः कोरोनाच्या संकटामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध शहरांमध्ये तसेच परराज्यात देखील नागरिक अडकलेले आहेत. अनेकजण त्यांच्या मदतीसाठी धावून जात आहेत, किंवा ते आहेत त्याच ठिकाणी त्यांना मदत मिळवून देत आहेत. अशाच राज्यच्या विविध भागात नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी स्थलांतरित झालेले आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या पैठणकरांसाठी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. युवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून कुठल्याही मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करत भुमरे यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या शंभरहून अधिक कुटुंबांपर्यंत आवश्यक मदत पोहचवली आहे.

विलास बापु भुमरे युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा उपक्रम राबवला जात असून राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या पैठणकरांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण मतदारसंघातील एकही व्यक्ती राज्यात कुठेही असला तर त्याचा शोध घेऊन त्याच्या पर्यंत सर्व प्रकारची मदत पोहचवण्याचे आदेशच युवा प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांना दिले असून भुमरे स्वःता या कामावर लक्ष ठेवून आहेत. औरंगाबादसह पुणे, मुंबई, ठाणे या सारख्या मोठ्या शहरांमध्ये पैठणमधील नागरिक अडकले असून त्यांना मदतीची गरज असल्याचे निरोप संदीपान भुमरे आणि युवा प्रतिष्ठानकडे येत होते.

त्यानंतर अशा संकटात सापडलेल्या कुटुंबांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणाच उभारण्यात आली आहे. तालुक्यातील भूमीपूत्रांना अशा अडचणीच्या काळात मदत पोहचवणे हे आपले कर्तव्य समजून सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शिवाय गावातील त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांचे मोबाईल क्रमांक किंवा ते सध्या कोणत्या शहरात, भागात आहेत याची माहिती देखील युवा प्रतिष्ठाणकडून मिळवली जात आहे.

कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर शिवसेनेच्या युवा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी विलास बापु भुमरे यांच्या नेतृत्वाखाली युवा प्रतिष्ठानची स्थापना करुन हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अडचणीत असलेल्या पैठणकरास मदतीसाठी चोवीस तास संपर्क साधता यावा यासाठी  9595819595, 9970757208, 9158705000, 9422652880, 9665591483, 9822673030 हे सहा हेल्पलाईन नंबर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

त्यामुळे आतापर्यंत पिंप्री चिंचवड, वसई, विरार,  मुंबई, पुणे, येरवडा, बारामती, देहु, आळंदी, चाकण, शिखरापुर, पालघर, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातून शंभरहून अधिक कुटुंबांनी हेल्पलाईनवर संपर्क साधून मदत मिळवली असल्याचे विलास भुमरे यांनी सरकारनामाशी बोलतांना सागितले. तर गेल्या 35 वर्षाच्या काळात पैठण  विधानसभा मतदार संघातील जनतेशी आपले आपुलकीचे व विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या महाभयंकर संकटात हा ऋणानुबंध जपण्यासाठी जनतेच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी उभा राहण्याचा निश्चय केला असुन या भावनेतूनच हा सेवाभावी उपक्रम सुरु केला केल्याचे संदीपान भुमरे यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com