हिंगणा ठरतोय हॉटस्पॉट, जिल्हाधिकाऱ्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान 

कोरोना रुग्णसंख्या यापुढे वाढणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिले. येरणगाव हे तालुक्‍याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. ग्रामीण भागातही आता कोरोनाने पाय पसरल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
corona
corona

हिंगणा (जि. नागपूर) ः नागपूर शहराला लागून असलेला हिंगणा तालुका हॉटस्पॉट होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन धास्तावले आहे. तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून 34 वर पोचली. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी काल तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केल्याची माहीती आहे. ग्रामीण भागातही कोरोना पाय पसरत असल्यामुळे प्रशासन धावपळ करताना दिसत आहे. 

बैठकीला उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, तहसीलदार संतोष खांडरे, उपविभागीय अभियंता जे. के. राव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, मुख्याधिकारी भारत नंदनवार, राहुल परिहार, नायब तहसीलदार महादेव दराडे, दर्शना सूर्यवंशी, ज्योती भोसले, मेश्राम उपस्थित होते. हिंगणा तालुक्‍यात 13 जूनपर्यंत 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. दोन गावांमध्ये 14 जून रोजी आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे दोन्हीही रुग्ण डिगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी भरती होते. तिथे त्यांचे नमुने तपासणीकरिता एका खासगी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. काल त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

डिगडोह ग्रामपंचायतअंतर्गत इंदिरामातानगरमधील 80 वर्षीय वृद्ध व दुसरा येरणगाव या खेडेगावातील एक 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोरोना "हॉटस्पॉट' ठरत असलेल्या हिंगणा तालुक्‍यात उपाययोजना कोणत्या सुरू आहेत, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठक घेतली. वानाडोंगरीतील कोविड सेंटर तातडीने कार्यान्वित करावे, वानाडोंगरी नगर परिषद व हिंगणा नगरपंचायतीने तातडीने घरोघरी सर्वेक्षण करावे, नागरिकांची गर्दी जास्त होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, हिंगणा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात यावी, यासह इतर सूचना जिल्हाधिकाऱ्यां दिल्या. 

रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व अधिकाऱ्यांचे त्यांनी कान टोचले. कोरोना रुग्णसंख्या यापुढे वाढणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिले. येरणगाव हे तालुक्‍याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. ग्रामीण भागातही आता कोरोनाने पाय पसरल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे सर्व उपाययोजना तालुक्‍यात कराव्या आणि लोकांमधील धास्ती कमी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्‍यातील अधिकाऱ्यांना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com