पोलीस दलातील कोरोनाबाधित जवानांकडून रुग्णालयात परिचारिकांना शिवीगाळ

जवानांच्या या हुल्लडबाजी व गैरवर्तणुकीचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत या जवानांची लेखी तक्रारच जिल्हाधिकीरी तसेच राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक १२, हिंगोली यांच्या समादेशकांकडे करण्यात आली आहे.
coronted police insult nuers news hingoli
coronted police insult nuers news hingoli

हिंगोलीः  कोरोना संसर्ग झालेल्या राज्य राखीव पोलीस बल गट हिंगोलीतील काही जवांनावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण हे जवान नियमांचे पालन न करता गच्चीवर, रुग्णालयाच्या आवारात फिरत असलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर काही दिवसांपुर्वी त्यांनी आयसोलेशन वार्डाताली परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ करत, तुम्हालाही कोरोनाचा संसर्ग केल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जवानांच्या हुल्लडबाजी आणि गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास यांनी या जवानांची लेखी तक्रार जिल्हाधिकारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरातील डॉक्टर, नर्स व रुग्णालयातील कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता कुटुंबापासून दूर राहत आहेत. परंतु कोरोनाबाधित रुग्णांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे प्रकार देशाच्या काही भागात उघडकीस आले होते. दिल्लीच्या तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही संशयित कोरोना रुग्णांकडून दिल्लीत असाच प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर राज्य राखीव दलातील पोलीसांकडून असा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हिंगोलीमध्ये राज्याच्या विविध भागात बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव दलातील जवानांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. बंदोबस्तावरून घरी परतल्यानंतर तपासणी केली असता या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात काहीजणांवर उपचारर सुरू आहेत. सुरूवातीला तर या जवानांनी रुग्णालयात भरती होण्यासच नकार दिला होता. पण भरती झाल्यावर देखील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांना सहकार्य न करता त्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, वार्डात न थांबता रुग्णालयाच्या गच्चीवर किंवा परिसरात मुक्तपणे फिरणे असे प्रकार जवांनाकडून सुरू होते.

तुम्हालाही संसर्ग करू...

जवानांच्या या हुल्लडबाजी व गैरवर्तणुकीचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत या जवानांची लेखी तक्रारच जिल्हाधिकीरी तसेच राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक १२, हिंगोली यांच्या समादेशकांकडे करण्यात आली आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास यांनी म्हटले आहे की, कोरोनाबाधित जवान हे आपल्या आयसोलोशन वार्डातील बेडवर न थांबता वार्डात व रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असतात. त्यामुळे रुग्णालयातील अन्य रुग्ण व परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातवरण आहे. यापुर्वी पाच मे रोजी देखील जवानांच्या गैरवर्तणुकीबद्दल लेखी तक्रार रुग्णालयातील नर्स, कक्षसेवक तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

आम्हाला कोरोना झाला आहे, आम्ही तुम्हालाही संसर्ग केल्याशिवाय राहाणार नाही, तुम्ही आमचे काहीच करू शकत नाही, अशा धमक्या हे जवान देत असल्याचे यात तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.  जवानांच्या अशा वागण्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून कोरोबाधितांवर उपचार करणे अवघड झाले आहे. हा गंभीर प्रकार असून याची तात्काळ दखल घ्यावी, जवानांना योग्य ती समज देवून शासन व आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवावा असे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com