आता लढूनच आमदार होणार  : आमदार डॉ. विश्वजित कदम 

आता मला बिनविरोध आमदार व्हायचे नाही. मला यावेळी लढून आमदार व्हायचे आहे, असे मत आमदार डॉ.विश्वजित कदम यांनीदेवराष्ट्रे (ता.कडेगाव) येथे व्यक्त केले.
आता लढूनच आमदार होणार  : आमदार डॉ. विश्वजित कदम 

कडेगाव : आता मला बिनविरोध आमदार व्हायचे नाही. मला यावेळी लढून आमदार व्हायचे आहे, असे मत आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी 
देवराष्ट्रे (ता.कडेगाव) येथे व्यक्त केले.

डॉ.विश्वजित कदम यांनी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी काँग्रेस कार्यकर्ते सुनील जगदाळे आपल्या भाषणात म्हणाले, की डॉ.विश्वजित कदम यांना आता पुन्हा एकदा बिनविरोध आमदार करुयात. 

त्यावर जगदाळे यांचे भाषण थांबवत डॉ.विश्वजित कदम म्हणाले, की मी एकवेळ बिनविरोध आमदार झालो आहे. परंतु आता मला बिनविरोध आमदार व्हायचे नाही, निवडणुक मैदानात उतरुन लढून आमदार व्हायचे आहे.

सुनील जगदाळे यांच्या भाषणाचा धागा पकडत कार्यकर्ते विजय मोहिते म्हणाले, की डॉ. विश्वजित यांना एकदा नाही तर पुन्हा पुन्हा आमदार करावयाचे आहे. त्यावर गिरीश गोंदिल म्हणाले, की डॉ. विश्वजित यांना यावेळी आमदार, पुढच्यावेळी मंत्री व त्यानंतर मुख्यमंत्री करावयाचे आहे. अशा अर्थाने सुनील जगदाळे हे विश्वजित यांना एकवेळ आमदार करा असे म्हणाले आहेत, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com