कार्यालयाच्या ताब्यासाठी इंदापूर कॉंग्रेस हर्षवर्धन पाटलांशी लढणार ? 

 कार्यालयाच्या ताब्यासाठी इंदापूर कॉंग्रेस हर्षवर्धन पाटलांशी लढणार ? 

पुुणे ः इंदापूर तालुका कॉंग्रेसचे कार्यालय पुन्हा कॉंग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढाई करण्याचा निर्णय पुणे जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी (ता.26) पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा ठरावही या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. 

हे कार्यालयावर भाजपने अनधिकृत ताबा मिळविल्याचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. या वृत्ताला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार संजय जगताप यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे हे कार्यालय परत मिळविण्यासाठी कायदेशीर पद्धतीने जाहीर नोटीस दिली जाणार आहे.

यानुसार लवकरच कायदेशीर सल्ला घेऊन, त्यादृष्टीने पावले उचलली जाणार असल्याचेही आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले. इंदापूर तालुका कॉंग्रेसचे कार्यालय हे कॉंग्रेसने 1981 मध्ये बांधले आहे. त्यानुसार मागील सुमारे चाळीस वर्षांपासून या कार्यालयावर कॉंग्रेसचा ताबा आहे. शिवाय ते कॉंग्रेसच्याच मालकीचे आहे. 

मात्र या तालुक्‍यातील तत्कालीन कॉंग्रेस नेते असलेले माजी मंत्री 2015 पासूनच भाजपत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील होते. संबंधित माजी मंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रीतसर भाजपत प्रवेश केला आहे. संबंधित माजी मंत्र्यांनीच कॉंग्रेसच्या या कार्यालयावर भाजपचा झेंडा लावत,

हे कार्यालय अनधिकृतपणे ताब्यात घेतले असल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला आहे. दरम्यान, या बैठकीत इंदापूर शहर कॉंग्रेस आणि इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

जिल्हाध्यक्ष, आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, खजिनदार महेश ढमढेरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा सावंत, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com