yuvraj_kamte_kothale
yuvraj_kamte_kothale

अनिकेत कोथळे प्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक कामटे बडतर्फ : मुख्यमंत्री

मुंबई  : सांगली येथील पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तरा द्वारे दिली.

अनिकेत कोथळे प्रकरणी कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार व अन्य सदस्यानी तारांकित प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यान्नी लेखी उत्तर दिले.

अनिकेतचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत पोलीस कोठडीत मृत्यू झास्लानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी अनिकेतचा मृत देह आंबोलीच्या घाटात जाळून टाकल्याची कबुली फडणवीस यांनी दिली. 

दुसरा आरोपी अमोल भंडारे याच्या समक्ष हा प्रकार पोलिसांनी केल्यानंतर त्याची वाच्यता होऊ नये यासाठी त्यालाही अशा प्रकारे मारण्यात येईल, अशी धमकी भांडारेला पोलिसांनी दिली होती. या हत्येप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा सीआयडी कडून सखोल तपास सुरू आहे. 

सदर प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कामटे, दोन हवालदार, एक शिपाई, पोलीस वाहन चालक आणि एक खाजगी व्यक्ती यांचा समावेश असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलीस कर्मचाऱयांना सुरुवातीला निलंबित करण्यात आले होते, मात्र घटनेतील क्रूरता लक्षात घेता सर्वांनाच पोलीस सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com