लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अॅटी कोरोना पोलिस मुख्यमंत्र्यांना भावला

जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी या उपक्रमाची माहिती सुरवातीला मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिली. तेव्हाच ठाकरे यांनी उपक्रमाची कौतुक करत उपक्रम राज्यभर राबवण्याच्या सूचना दिल्या.
udhav thackeray, latur collector news
udhav thackeray, latur collector news
Published on
Updated on

लातूर: कोरोनाला घरात पाय ठेऊ न देण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सुरू केलेला अॅंटी कोरोना पोलिस (एसीपी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूपच भावला. त्यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक देखील केले. हा उपक्रम नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या घरी पाहून मुख्यमंत्र्यांनी या अभिनव प्रयोगाची विशेष दखल घेतल्याचे दिसून आले.

घरातल्या घरात काळजी करणारा आणि काळजी वाहणारा हा उपक्रम फार महत्वाचा आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी उपक्रमाची स्तुती केली. यामुळे संकटाच्या काळात जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या एका चांगल्या लातूर पॅटर्नची चर्चा घडून येत असल्याने प्रशासनाचे बळ वाढले आहे.
  
स्वतःहून स्वतःची काळजी घेण्यात फारसे गांभीर्य न दाखवणाऱ्यांची संख्या समाजात मोठी आहे, पण दुसऱ्याने किंवा घरातील एखाद्या आपल्यापेक्षा लहान व्यक्ती किंवा मुलाने आपल्याला त्याची जाणीव करून दिली तर ते चटकन लक्षात राहते. प्रत्येकाचा हा स्थायी भाव जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी ओळखून कोरोनाला घराच्या बाहेरच रोखून धरण्यासाठी उपयोगात आणला आहे. यातूनच त्यांनी अॅंटी कोरोना पोलिस हा उपक्रम सुरू करत स्वतःच्या घरी एसीपी म्हणून मुलगी शाश्वती व पत्नी सोनम यांची नियुक्ती केली.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी घरातील व्यक्तींना शक्यतो घराबाहेर जाऊ न देणे, जाणे गरजेचेच असेल तर त्यांनी तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधला आहे का? याची खातरजमा करून त्यांना मास्क व रूमाल बांधण्यास प्रवृत्त करणे, घरी परतल्यानंतर त्यांना निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) करण्यास सांगणे, साबणाने स्वच्छ हात धुण्यास सांगणे आदी जबाबदारी हे एससीपी पार पाडत आहेत.

यासोबत घरातील आजारी व ज्येष्ठ व्यक्तींची काळजीही हे एसीपी घेताना दिसतात. त्यांनी औषधी वेळेवर घेतल्या की नाही इथपासून तर त्यांचा आजार वाढला तर नाही ना, इथपर्यंत हे एसीपी काळजी वाहतात. यामुळे कोरोनाला घराबाहेर रोखण्यासाठी तसेच पूर्वीच्या आाजाराविरूद्ध लढण्यासाठी कुटुंबांतील लोकांना बळ मिळाले आहे.

यानिमित्ताने कोणीतरी आपली खूप काळजी करतो, ही भावनाच सर्वांचे मनोबल वाढवत आहे. जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी या उपक्रमाची माहिती सुरवातीला मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिली. तेव्हाच ठाकरे यांनी उपक्रमाची कौतुक करत उपक्रम राज्यभर राबवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही दिवसातच नांगरे पाटील यांनी घरी उपक्रमाची सुरवात करून हा व्हिडीओ व्हायरल केला.

या व्हिडीओमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या अभियानाचे कौतुक करत उपक्रम सर्वांनी घरोघऱी राबवावा, असे आवाहन केले.  नांगरे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या अभियानाला बळ दिल्याबद्दल श्रीकांत यांनी त्यांचे आभार व्यक्त केले होते. यातच रविवारी लॉकडाऊनमधून काही सवलती जाहिर करताना ठाकरे यांनी पुन्हा नांगरे पाटील यांच्या घरी हा उपक्रम राबवल्याचे ऑनलाईन बातमीद्वारे पाहून आनंद व्यक्त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com