सुधाकरपंत परिचारक यांच्या संस्था महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आल्या - लक्ष्मण ढोबळे

सुधाकरपंत परिचारक यांच्या संस्था महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आल्या. पण ज्या नेतृत्वाला आपण दहा वर्षे सत्ता दिली त्या भारतभालके यांनी कोणत्या संस्था जोपासल्या ? असा आरोप माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला.
सुधाकरपंत परिचारक यांच्या संस्था महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आल्या - लक्ष्मण ढोबळे

भोसे (ता. मंगळवेढा) - सुधाकरपंत परिचारक यांच्या संस्था महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आल्या. पण ज्या नेतृत्वाला आपण दहा वर्षे सत्ता दिली त्या भारत भालके यांनी कोणत्या संस्था जोपासल्या ? असा आरोप माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला.

भाजपा, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ रड्डे शिरनांदगी मानेवाडी रेवेवाडि लोणार महंमदाबाद हुन्नूर पडोळकरवाडी आदी भागाच्या दौय्रात रड्डे येथील जाहीर सभेत बोलत होते. याप्रसंगी रयत क्रांतीचे राज्याचे नेते दीपक भोसले, माऊली हळवणकर, वामनराव माने, दिनकर भाऊ मोरे,  दाजी भुसनर आदी उपस्थित होते.

माजी मंत्री ढोबळे म्हणाले, की गेल्या अनेक महिन्यांपासून साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा पगार नाही त्यांच्या घरी आलेल्या अडीअडचणी कोण सोडवणार ?त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था कोण करणार ?त्यांच्या माता-पित्यांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी रक्कम असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करीत ढोबळे यांनी या सर्वांना संबोधित करीत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये ही वेळ वाया घालवू नका. ही वेळ जर चुकली तर आपल्या अनेक पिढ्या वाया जातील. दर दिवाळीला पण गडी बदलतो. काम करत नसलेला गड्याला घरी पाठवतो. त्याच पद्धतीने आता भालके यांना घरी पाठवा आणि पंढरीच्या पांडुरंगाला विधानसभेत पाठवण्यासाठी सुधाकरपंत परिचारक यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन श्री ढोबळे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com