पुढारी, पोलिसांसह दहा जणांना जुगार खेळताना पकडले

प्रतिष्ठितांच्या जुगार अड्ड्यांच्या ठिकाणी मद्यपान सुरू असते, त्याचा फटका सामान्यांना बसतो. अशा स्वरूपाच्या तक्रारी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांना कारवाईसाठी न पाठविता, सीपींनी सत्य परिस्थिती बाहेर काढण्यासाठी गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांना कारवाईचे आदेश दिले.
Gambling
Gambling

अमरावती : दोन पोलिस कर्मचारी, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह एकूण दहा जुगाऱ्यांना एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर पकडण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून हा जुगार अड्डा सुरू होता, अशी माहिती आहे.
 
प्रतिष्ठितांच्या जुगार अड्ड्यांच्या ठिकाणी मद्यपान सुरू असते, त्याचा फटका सामान्यांना बसतो. अशा स्वरूपाच्या तक्रारी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांना कारवाईसाठी न पाठविता, सीपींनी सत्य परिस्थिती बाहेर काढण्यासाठी गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांना कारवाईचे आदेश दिले. प्रशांतनगर येथील मनपाच्या बगीच्याजवळ असलेल्या शिरभाते कॉम्प्लेक्‍समध्ये फ्रेण्ड्‌स कॉर्नर डेली नीड्‌स या नावाचे एक छोटे हॉटेल आहे. रहिवासी परिसर असल्याने अनेकांना येथील जुगाऱ्यांचा प्रचंड त्रास सुरू होता. सदर दुकान हे संघरक्षक विजय गजभिये यांच्या मालकीचे आहे. 

येथे गैरकारभार सुरू असल्याच्या तक्रारीवरून सीपींनी कारवाईचे आदेश दिले. या जुगार अड्ड्यावर कारवाई करून पोलिसांनी किरण मधुकर गुडधे, सईद छोटू मुन्नीवाले, अशोक भोजराज जवंजाळ, विलास श्रीधर देशमुख, शुभम संघपाल कांबळे, योगेश ज्ञानेश्वर मोहोड, अविनाश रामराव सोनसने, अमोल मच्छिंद्र नाईकनवरे, संजय गोपाळराव डाखोरे व संघरक्षक विजय गजभिये या दहा जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून 19 हजार 670 रुपयांची रोख रक्कम, 8 मोबाईल, चार दुचाकी, जुगाराचे साहित्य असा एकूण 94 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दहापैकी नाईकनवरे व डाखोरे हे दोघे पोलिस कर्मचारी असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी सांगितले.         (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com