अंतर्गत कुरबुरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार पडणार : रामदास आठवले

ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वारंवार विरोध केला, त्याच पक्षांबरोबर उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन केली आहे. तिन्ही पक्षांत मनभिन्नता असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या कारभारावर काँग्रेस नाराज आहे. सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काम करताना अवघड झाले आहे.
Mahavikas Aghadi government will fall due to internal grievances says RPI Minister Ramdas Athavale
Mahavikas Aghadi government will fall due to internal grievances says RPI Minister Ramdas Athavale

सातारा : महाविकास आघाडीतील अनेक आमदार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. त्यांना मध्यावधी निवडणुकीची भीती वाटत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ असून निवडणूक टाळण्यासाठी ते फुटून आमच्याकडे येतील आणि भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. 

मंत्री आठवले हे दोन दिवस सातारा दौऱ्यावर होते. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांना जे मान्य नव्हते, ते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी केले आहे. भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले असून त्यांच्यात कुरबुरी सुरू आहेत. सन्मानाच्या मुद्यावर काँग्रेसने पाठिंबा काढल्यास हे सरकार जावू शकते आणि पुन्हा एकदा "मी पुन्हा येईन' हा देवेंद्र फडणवीस यांचा नारा ऐकण्याची संधी मिळेल, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

ते म्हणाले,"ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वारंवार विरोध केला, त्याच पक्षांबरोबर उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन केली आहे. तिन्ही पक्षांत मनभिन्नता असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या कारभारावर काँग्रेस नाराज आहे. सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काम करताना अवघड झाले आहे. त्यातच काँग्रेसने योग्य सन्मान मिळत नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली असून ते बाहेर पडल्यास सरकार पडेल.'' 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्‍यक आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आदेश मानत नसल्याचे दिसून येत आहे. 

- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com