राज्यमंत्री बनसोडेंनाही कोरोनाची लागण, मुंबईत उपचार सुरू

थोडासा ताप आणि घशामध्ये खव -खव होत होती. त्यामुळे स्वॅब तपासणीसाठीदिला होता. तो पॉझिटीव्ह आला. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या नागरीकांनी होम क्वारंटाईन व्हावे. तसेच काळजी घ्यावी, असे आवाहन बनसोडे यांनी केले.
state minister sanjay bansode effected corona news
state minister sanjay bansode effected corona news

लातूर ः कोरोनाच्या काळात गेल्या अडीच तीन महिन्यापासून सातत्याने रस्त्यावर उतरून काम करणारे राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री व उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रविवारपासून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व औशाचे आमदार अभिमन्यू पवार या लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाली आहे. या पैकी पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. तर निलंगेकर यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत.

लातूर जिल्ह्यात विशेषतः उदगीरमध्ये कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनामुळे मृतांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे एखाद्या कोरोना योद्धासारखे काम बनसोडे हे गेल्या काही महिन्यापासून करीत आहेत.  शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्यापासून ते नागरीकांना दिलासा देण्याचे काम ते करीत होते. उदगीरमध्ये कोरोनावर मात करणाऱ्या नागरीकांची आवर्जून भेट घेवून त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यातही ते पुढे होते.

एकीकडे हे करीत असताना उदगीर मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाच्या वारंवार बैठका घेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांनी कामाला लावले. उदगीर मतदारसंघात विकास कामेही सुरु केली आहेत. यातच सात दिवसापूर्वी ते मुंबईत गेले होते. दोन दिवसापूर्वी त्यांना ताप, खोकला, अंगदुखी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी आपला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. रविवारी (ता. २६) कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तान महिन्यात खूप पळापळ झाली

मागील तीन महिन्यापासून कोरोनाच्या काळामध्ये उदगीर मतदारसंघात व लातूर
जिल्ह्यातील उद्भवलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असताना, प्रत्येक कंटेनमेंट झोन मध्ये पाहणी करणे, हॉस्पिटलची पाहणी करणे, व्यवस्थापन पाहणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, या व अशा अनेक कामानिमित्त पळापळ करत होतो. मतदारसंघातील मंत्रालयात काही कामे प्रलंबित होती. पाच-सहा दिवसांपासून मुंबईमध्ये येऊन कामाचा पाठपुरावा करत होतो.

यातच थोडासा ताप आणि घशामध्ये  खव -खव होत होती. त्यामुळे स्वॅब तपासणीसाठी
दिला होता. तो पॉझिटीव्ह आला. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या नागरीकांनी होम क्वारंटाईन व्हावे. तसेच काळजी घ्यावी, असे आवाहन बनसोडे यांनी केले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com