हिंगोलीत सेनेने हेमंत पाटलांना उमेदवारी दिल्याने राजीव सातव काय करणार?

हिंगोलीत सेनेने हेमंत पाटलांना उमेदवारी दिल्याने राजीव सातव काय करणार?

हिंगोली : शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे मागच्या निवडणुकीत मोदी लाटेत केवळ 1632 मतांनी  झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी व जातीय समीकरणांची यशस्वी खेळी करण्यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी युतीचा उमेदवार कोण, असा प्रश्न गेल्या वर्षभरापासून  विचारणाऱ्या हिंगोलीकर व कार्यकर्त्यांना आज अखेर उत्तर मिळाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 
अखेर मातोश्रीवरून हिंगोलीसह राज्यातील शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

यामध्ये राज्याचे माजी सहकार मंत्री तथा हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार जयप्रकाश मुंदडा यांना मागे टाकत नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी बाजी मारली आहे,

हेमंत पाटील हे नांदेड दक्षिणचे  विद्यमान आमदार असून, निष्ठावंत शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक, जिल्हाप्रमुख ते शिवसेना आमदार असा हेमंत पाटील यांचा प्रवास असून हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क आहे.

काॅंग्रेसकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांची उमेदवारी घोषित झाली नसली तरी सातव हेच काँग्रेसचे उमेदवार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. ते निवडणूक रिंगणात नसतील, अशी सुरवातीची चर्चा होती. आता नव्या समीकरणात ते काय करणार, याची उत्सुकता आहे. 

माळी समाजाचे असलेल्या राजीव सातव यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेनं मराठा कार्ड खेळले असून यामुळे हेमंत पाटलांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी देण्यामागे हे प्रमुख कारण आहे. हिंगोली लोकसभेसाठी शिवसेनेला याही निवडणुकीत जिल्ह्याबाहेरचा उमेदवार आयात करावा लागला. 2014 च्या निवडणुकीचा इतिहास पाहता शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे, शिवसेनेचे तत्कालीन खासदार सुभाष वानखेडे यांचा मोदी लाटेतही राजीव सातव यांनी धक्कादायकरित्या  पराभव केला होता.

पक्षातील गटबाजीला कंटाळून गेल्या निवडणुकीतील उमेदवार व माजी खासदार सुभाष वानखेडे,  शिवसेनेचे तत्कालीन माजी आमदा गजानन घुगे यांना पक्ष सोडावा लागला. आज घडीला हिंगोली लोकसभा मतदारसंघात केवळ वसमत विधानसभा व नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघ सोडला तर तिसरा आमदार नाही. त्यामुळे मतदारसंघाबाहेरील उमेदवाराला येथे आयात करावे लागेल.  2019 च्या निवडणुकीत पक्षातील गटबाजीचा फटका बसू नये याची काळजी घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा कार्ड व बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com