आमदार नीलेश लंकेना 'कोरोना केसरी' किताब; हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्याकडून सन्मान 

हिंदकेसरी वेताळ म्हणाले, "लोकप्रतिनिधी व समाजसेवक याची योग्य सांगड घालत आमदार लंके यांनी लोकसेवा सुरू ठेवली आहे. एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे आदराने पाहात आहे. त्यांनी आरोग्यसेवेत स्वतः सहभागी होऊन गरजूंसाठी कोरोनाशी दोन हात केले. म्हणून हा प्रेरणादायी गौरव करण्यात आला.''
MLA Nilesh Lankena 'Corona Kesari' Award; Honors from Hindkesari Santosh Vetal
MLA Nilesh Lankena 'Corona Kesari' Award; Honors from Hindkesari Santosh Vetal

कऱ्हाड : कोरोनाच्या कठीण काळामध्ये आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी स्वतः कोविड सेंटर (Covid Center) सुरू करून तेथेच राहून रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल हिंदकेसरी संतोष वेताळ (Santosh Vetal) यांनी त्यांना 'कोरोना केसरी' किताब (Corona Kesari) देत सन्मानित केले. त्यांना अडीच किलो चांदीची गदा, कोरोना केसरी सन्मानपत्र, एक लाखाचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. (MLA Nilesh Lankena 'Corona Kesari' Award; Honors from Hindkesari Santosh Vetal)

हिंदकेसरी पैलवान वेताळ हे गुरू भेट म्हणून ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अडीच किलोंची चांदीची गदा भेट देणार होते. मात्र, त्यांची प्रकृती आणि सध्याच्या वातावरणामुळे त्यांना न भेटता कोरोना महामारीच्या काळात लंकेंनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा किताब देत गौरविण्यात आले. नवनाथ पाटील, सुर्लीचे सरपंच दत्तात्रय वेताळ, निसार मुल्ला, सोनू मदने, माजी उपसरपंच कृष्णत मदने, अमोल लंके, सूरज भुजबळ उपस्थित होते. 

या वेळी हिंदकेसरी वेताळ म्हणाले, "लोकप्रतिनिधी व समाजसेवक याची योग्य सांगड घालत आमदार लंके यांनी लोकसेवा सुरू ठेवली आहे. एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे आदराने पाहात आहे. त्यांनी आरोग्यसेवेत स्वतः सहभागी होऊन गरजूंसाठी कोरोनाशी दोन हात केले. म्हणून हा प्रेरणादायी गौरव करण्यात आला.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com