शिवसेनेचे पक्षनिरीक्षक नांदेडात दाखल, उमेदवारांची  चाचपणी 

येत्या ता. २८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करावयाचा असून ता. एक ते ता. १५ मार्च या दरम्यान शिवसेनेतर्फे राज्यभर शेतकरी, सर्वसामान्यांसाठी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Tupe---Jaiswal--Danve
Tupe---Jaiswal--Danve

नांदेड  : शेतकऱ्यापासून ते सर्वसामान्यांपर्यत शिवसेनेकडून सत्तेत असल्यामुळे काय फायदा झाला, प्रश्न, समस्या व मागण्यांसंदर्भात काय झाले? ही व इतर माहिती शिवसैनिकांकडून घेण्यासाठी त्याचबरोबर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची तयारी कुठपर्यंत आहे, याची चाचपणी  जिल्ह्यात करण्यात आली.

 त्यासाठी शिवसेनेचे तीन पक्षनिरीक्षक नांदेडला दाखल झाले असून तीन दिवस त्यांचा मुक्काम राहणार आहे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत शिवसेना असली तरी आता आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

त्यामुळे त्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात बुधवारी पक्षनिरीक्षक पाठविण्यात आले आहेत. नांदेडला बुधवारी औरंगाबादचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि माजी महापौर तुपे यांचे आगमन झाले. या तिघांना जिल्ह्यातील तीन तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

श्री. जैस्वाल यांनी नांदेड उत्तर, दक्षिण आणि लोहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नांदेडच्या विश्रामगृहात बैठक घेतली.

श्री. तुपे यांनी नायगाव, देगलूर आणि मुखेड तर जिल्हाप्रमुख दानवे यांनी भोकर, हदगाव आणि किनवटला भेट देण्यासाठी रवाना झाले.

नांदेड जिल्ह्यातील दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांचे नाव हिंगोली लोकसभेसाठी चर्चेत असून ते देखील पक्षनिरीक्षक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले. 

नांदेडला झालेल्या बैठकीत श्री. जैस्वाल यांनी सर्वप्रथम पदाधिकारी, शिवसैनिक यांचे मत जाणून घेतले. भारतीय जनता पक्षासोबत आपण सत्तेत जरी असलो तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहा. कर्जमाफी प्रकरणात किती शेतकरी खुश आहेत व नाराज आहेत, याची माहिती ठेवा. सध्या ग्रामिण भागात जनतेचा कल कोणत्या पक्षाकडे आहे, याचेही अवलोकन करुन शासनाच्या योजन तळागाळापर्यंत पोहचवा, असा सल्ला त्यांनी दिला. पक्ष बांधणीसाठी गाव तिथे शाखा सुरू करुन येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज रहा, असे आवाहन त्यांनी केले.
  
यावेळी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, नांदेड उत्तरचे शहरप्रमुख दत्ता कोकाटे पाटील, महानगरप्रमुख निखील लातूरकर, शहरप्रमुख प्रदीप जाधव, नगरसेवक बालाजी कल्याणकर, आनंद पाटील तिडके, दयाल गिरी, प्रमोद खेडकर, अशोक उमरेकर, बालासाहेब देशमुख, बिल्लू यादव, तुलजेश यादव यांच्यासह सेनेचे विविध विभागाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. 

शिवसेनेतर्फे राज्यभर अभियान...
शिवसेनेच्या वतीने पक्षनिरीक्षक विधानसभा मतदारसंघनिहाय तीन दिवसात माहिती घेऊन त्याचा अहवाल तयार करणार आहेत. सत्तेत असल्यामुळे सेनेची आणि शिवसैनिकांची स्थिती काय आहे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे म्हणणे काय आहे, पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच आगामी निवडणुकात कोण कोण इच्छुक आहे, याची चाचपणी करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com