मर्जीतील ठेकेदारांना कंत्राट ;माणगावचे  कृषी अधिकारी  सक्तीच्या रजेवर 

Sunil-Tatkare-Ramraje.jpg
Sunil-Tatkare-Ramraje.jpg

मुंबई   माणगाव येथे कार्यरत असणारे उपविभागीय कृषी अधिकारी रामकृष्ण जगताप यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिले.आमदार सुनिल तटकरे यांनी श्री. जगताप  कालावधीत होत असलेल्या जलयुक्त शिवार कार्यक्रमातंर्गतच्या अनियमिततेचे व भ्रष्टाचारावर टीका केली .  

जलयुक्त शिवार योजनेतंर्गत काम करताना मर्जीतल्या कंत्राटदारांना ठेका मिळवून देणे, ई-टेंडरिंग असतानासुध्दा तांत्रिक पध्दतीने या ठेकेदारांना मदत करुन स्थानिकांना जलयुक्त शिवाराची कामे डावलल्याचा आरोप आमदार सुनिल तटकरे यांनी केला.

त्याचबरोबर प्रशासकीय कामांच्या अनेक तक्रारी असल्याने, कृषीविषयक विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विचारात न घेणे,अधिनस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे, निकृष्ट दर्जाची कामे करणे, कंत्राटदाराबरोबर मदयप्राशन करणे इत्यादी गोष्टींचा उहापोह आमदार सुनिल तटकरे यांनी केल्यानंतर विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जगताप यांना सक्तीच्या रजेवर पाठवून जिल्हयाबाहेर बदली करण्याचे निर्देश शासनाला दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com