निखिल गुप्ता औरंगाबादचे नवे पोलीस आयुक्त, उद्या घेणार सूत्र

पोलीस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन, उपरोक्त अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कार्यमुक्त करावे, अशा सूचनाही गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
Nikhil Gupta
Nikhil Gupta

नागपूर : औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी आता औरंगाबादचे पोलीस आयुक्त असणार आहेत निखिल गुप्ता. श्री गुप्ता यांनी यापूर्वीही औरंगाबादमध्ये पोलिस उपायुक्त म्हणून काम केलेले आहे. उद्या ते आपल्या पदाची सूत्रे स्विकारतील, अशी माहिती आहे. निखिल गुप्ता केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आले आहेत.

नागपुरात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून चिरंजीव प्रसाद लवकरच रुजू होणार आहेत. गृहमंत्रालयातर्फे आज पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला. याशिवाय इतर बदल्यांमध्ये औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कुमार यांना सध्याचे अपर पोलिस महासंचालक श्रेणीतील पद विशेष पोलिस महानिरीक्षक श्रेणीमध्ये अवनत करून नियंत्रक वैद्यमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. तर नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांची बदली औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. 

भारतीय पोलीस सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम मधील कलम २२ (न) च्या तरतुदीनुसार भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या उपरोक्तप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत. सोबत पोलीस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन, उपरोक्त अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कार्यमुक्त करावे, अशा सूचनाही गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com