सोशल डिस्टंसिंग आणि मास्कसाठी पोलिस आयुक्त उतरल्या रस्त्यावर

वॉलकट कंपाउंड येथील देशी दारू दुकानासमोर चोवीस तास जणू जत्रा भरते. सर्वच नियम धाब्यावर बसविले जातात. कोतवाली पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता, अनेकांनी मास्क घातले नव्हते. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी वाद घातला.
Arti Singh IPS
Arti Singh IPS

अमरावती : कोरोनाचा उद्रेक  उग्र झाला असतानाही लोकांना त्याचे गांभीर्य कळलेले दिसत नाही. सूट मिळताच लोकांना विनाकारण रस्त्यांवर, दुकानांमध्ये गर्दी करणे सुरू केले. स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या अशा लोकांवर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी काल रात्री स्वतः रस्त्यांवर उतरून कारवाई केली. 

शहरातील आइस्क्रीम पार्लर, हॉटेल, ब्रॅण्डेड चहाच्या दुकानांसमोर नागरिक गर्दी करीत असल्याचे लक्षात येताच डॉ. आरती सिंग यांनी गाडगेनगर परिसरात अनेकांना शाब्दिक बत्ती दिली. एका चहाच्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे दृश्य त्यांना दिसले. शिवाय येथे आलेल्या ग्राहकांसोबत चक्क हॉटेल चालविणाऱ्यानेही मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे समीर सुरेश पाटील याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. येथे उपस्थितांना मास्क न वापरल्यास कारवाई होईल, असा इशारा दिला. 

शिवाय बीएसएनएल ऑफीससमोरच्या एका आइस्क्रीम पार्लरमध्ये युवक, युवतींची गर्दी दृष्टीस पडली. तेथेही सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गौरव तनसुखलाल खत्री याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फ्रेजरपुरा पोलिसांना चपराशीपुरा येथील कॅम्प कॉर्नर हॉटेलसमोर युवक, युवतींसह महिलांची मोठी गर्दी दिसली. पोलिसांनी येथील अमीर ताजोद्दीन बासीत विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर व्यक्ती मास्क न वापरता खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोचविताना दिसला.

देशी दारू विक्रेत्यावरही गंडांतर
वॉलकट कंपाउंड येथील देशी दारू दुकानासमोर चोवीस तास जणू जत्रा भरते. सर्वच नियम धाब्यावर बसविले जातात. कोतवाली पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता, अनेकांनी मास्क घातले नव्हते. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे अनिरुद्ध विजय जयस्वाल याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.     (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com