समोर येताहेत चाइल्ड पोर्नोग्राफीतील काळे चेहरे! 

police unearthen faces behind child pornography
police unearthen faces behind child pornography

सोलापूर  : चाइल्ड पोर्नोग्राफीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हाती घेतलेल्या "ऑपरेशन ब्लॅक फेस' मोहिमेला चांगले यश मिळत आहे. "ऑपरेशन ब्लॅक फेस'अंतर्गत गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातून 1680 चाइल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे शोधून काढली असून, आजवर 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 38 जणांना अटक करण्यात आली आहे. 

चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये राज्यात मुंबई शहर आघाडीवर आहे. या ठिकाणी 653 तक्रारींमध्ये 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकास अटक करण्यात आली आहे. त्याखालोखाल पुणे शहराचा क्रमांक लागतो. पुण्यात 542 तक्रारींमध्ये 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोघांना अटक झाली आहे. "ऑपरेशन ब्लॅक फेस' ही मोहीम 5 जानेवारीपासून हाती घेतली. गेल्या दोन महिन्यांत पथकाने राज्यभरातून चाइल्ड पोर्नोग्राफीसंदर्भातील 1 हजार 680 प्रकरणे समोर आणली आणि संबंधित शहर आणि जिल्हा पोलिसांना त्याबाबतचा अहवाल पाठविला. त्यानुसार राज्यभरात स्थानिक पातळीवर तपास करून 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 38 जणांना अटक करण्यात आली आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सायबरचे पोलिस अधीक्षक बालसिंग रजपूत आणि त्यांच्या पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून "ऑपरेशन ब्लॅक फेस' मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत राज्यभरातून 1 हजार 680 व्हिडिओ इंटरनेटवर आढळून आले आहेत. हे व्हिडिओ अपलोड आणि ते शेअर करणाऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

चाइल्ड पोर्नोग्राफीचे प्रमाण देशात सगळीकडेच आहे. परंतु, सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल होत आहेत. चाइल्ड पोर्नोग्राफी हा गंभीर गुन्हा आहे. बालकांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ काढले जात असतील, ते सोशल मीडियावर शेअर केले जात असतील; तर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी. तुम्हाला चाइल्ड पोर्नोग्राफीची माहिती असतानाही ती न दिल्यास तोही गुन्हा ठरतो. 
- बालसिंग राजपूत, पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com