ऋषी कपूर यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली तेव्हा..

ऊर्मिला सियाल यांच्या तिसऱ्या मुलीचा 1986 साली नागपुरात विवाह झाला. या समारंभात संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होते. मात्र, चाहत्यांची प्रचंड गर्दी प्रीती यांच्या विवाहात बाधा ठरू शकते, हा अंदाज व्यक्‍त करून ऋषी कपूर यांनी उपस्थित राहू नये, अशी इच्छा राज कपूर यांनी व्यक्‍त केली होती.
Rishi Kapur
Rishi Kapur

नागपूर : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी काल सकाळी अखेरचा श्वास घेतला अन्‌ चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. विशेष म्हणजे नागपुरातील कुटुंबाशी सलगी साधलेल्या कपूर कुटुंबाचे कायमच नागपुरात येणे-जाणे असायचे. 1986 साली झालेल्या एका लग्न समारंभात संपूर्ण कपूर कुटुंबाने उपस्थिती लावली. मात्र, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ऋषी यांना समारंभाला येता आले नव्हते. ऋषी यांची बहीण अनू खेता यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 

राज कपूर यांची बहीण ऊर्मिला यांचा विवाह नागपुरातील खाणमालक चिरंजित सियाल यांच्याशी झाला. अन्‌ कपूर परिवाराचे नागपूरशी ऋणानुबंध जुळले. त्यानंतर कायमच कपूर कुटुंबीयांचे नागपुरात येणे-जाणे असायचे. सियाल यांच्या घरी कायमच राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर यायचे. त्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावरील ऋषी कपूर यांची एक झलक पाहण्यासाठी सियाल यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी व्हायची. याचसाठी ऋषी कपूर नागपुरात येणे टाळायचे, अशी आठवण अनू खेता यांनी सांगितली. 

ऊर्मिला सियाल यांच्या तिसऱ्या मुलीचा 1986 साली नागपुरात विवाह झाला. या समारंभात संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होते. मात्र, चाहत्यांची प्रचंड गर्दी प्रीती यांच्या विवाहात बाधा ठरू शकते, हा अंदाज व्यक्‍त करून ऋषी कपूर यांनी उपस्थित राहू नये, अशी इच्छा राज कपूर यांनी व्यक्‍त केली होती. या लग्नातील संपूर्ण कपूर कुटुंबाचे छात्राचित्र एका ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असले तरी त्यात ऋषी कपूर उपस्थित नाहीत. 

अखेरची भेट नोव्हेंबरमध्येच 
ऋषी कपूर यांची आत्येबहीण व ऊर्मिला सियाल यांची मुलगी अनू खेता यांनी त्यांची अखेरची भेट नोव्हेंबरमध्ये घेतल्याची आठवण अनू यांनी सांगितली. 

खड्ड्यांमुळे केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 
2017 साली होशंगाबादला गेलेले ऋषी कपूर नागपूरमार्गे परतणार होते. परतीच्या प्रवासात भोपाळ-नागपूर महामार्गावरील खड्ड्यांचा त्यांना त्रास झाला. त्रस्त झालेल्या ऋषी कपूर यांनी प्रवासातच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे तक्रार केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com