कोरोनाला अटकाव करणे शक्‍य : निसर्गोपचारतज्ञ डॉ. पथेंनी पाठविले पंतप्रधानांना पत्र 

निसर्गोरपचार तज्ञ डॉ. संदीप पथे गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. कर्करोग व हृदयविकार तज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. भारतीय पारंपारिक जीवनशैलीच्या माध्यमातून कोरोनाशी लढणे शक्‍य असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला असून, तसे पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
Letter to PM Modi
Letter to PM Modi

नागपूर : लॉकडाऊन कधी संपतय...पुन्हा रुचकर पदार्थांची चव कधी चाखायची ? असे एक दोन नव्हे तर असंख्य प्रश्‍न नागपूरकांच्या मनात घोंघावत आहेत. प्रत्येकजण लॉकडाऊन संपण्याची आतुरतेने वाट बघतोय. मात्र अशा स्थितीतही घरघुती पद्धतीने स्वत:ची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. एका निसर्गोपचार तज्ज्ञांनी काही घरघुती उपाययोजना करून कोरोनाशी लढण्याचा मार्ग थेट पंतप्रधानांनाच पत्राद्वारे कळवला आहे. 

प्रतापनगर भागात राहणारे निसगोपचार तज्ञ डॉ. संदीप पथे गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. कर्करोग व हृदयविकार तज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. भारतीय पारंपारिक जीवनशैलीच्या माध्यमातून कोरोनाशी लढणे शक्‍य असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला असून, तसे पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. मानवी शरिरातील पंचमहाभुतांचा समतोल राखणे म्हणजेच निसर्गोपचार प्रणाली असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही या जीवनशैलीचा उपयोग केला होता. तीच जीवनपद्धती आजच्या धकाधकिच्या काळात आणि संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत असताना उपयोगी पडणार असल्याचे डॉ. संदीप पथे यांनी पत्रात नमुद केले आहे. 

प्रत्येकजण घरी बसला असला तरी दहशतीत जगतो आहे. अशात प्रत्येकाची रोग प्रतिकारक क्षमता वाढणे गरजेचे असून, घरघुती उपचारांनी संसर्गाला रोखता येणे शक्‍य आहे. प्राकृतिक चिकित्सेमध्ये आहार आणि विहाराला विशेष महत्त्व दिल्या गेले आहे. दोघांचा समन्वय साधण्यासाठी ही जीवनपद्धती प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी या उपचारपद्धतीचा उल्लेख त्यांच्या भाषणात करावा, असे आवाहन देखील पत्रात करण्यात आले आहे. शिवाय "सेवा है यज्ञकुंड समिधासम हम जले' या ओळींप्रमाणे सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी पत्राद्वारे केले आहे. 

पत्रात नमुद केले असलेले उपचार 
नियमित सूर्यस्नान करणे, कोमट लिंबूपाणी अथवा लिंबूवर्गीय फळांचे सेवन करणे, संपूर्णत: शाकाहारी होणे, नियमित प्रायाणाम व तुळशीपत्र, गुळवेल, हळद, कलमी, काळे मिरे, अद्रकचा रस, गुळाचा रस अथवा मध घालून आयुर्वेदिक काढा घेणे, गव्हांकूर आवळ्याच्या रसासोबत घेणे असे काही उपचार पत्रात नमूद केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com