राऊत, अडसूळ यांच्याकडून कोविंद यांच्या 'नॉमिनेशन' वर स्वाक्षऱ्या

राऊत, अडसूळ यांच्याकडून कोविंद यांच्या 'नॉमिनेशन' वर स्वाक्षऱ्या

मुंबई  : सर्वांची उत्सुकता शिगेला लागलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नॉमिनेशन अर्जावर लोकसभेचे शिवसेना गटनेते आनंदराव अडसूळ आणि राज्यसभेचे गटनेते संजय राऊत यांनी बुधवारी नॉमिनेशन अर्जावर स्वाक्षरी केली. खासदार संजय राऊत यांनीच 'सरकारनामा' ला ही माहिती दिली.

एनडीएच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली. त्याच दिवशी सेनेचा वर्धापनदिन देखील होता. कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय घेऊ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. शिवसेनेने मवाळ भुमिका घेत कोविंद यांना पाठिंबा दिला. 

 आतापर्यंतच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पाहता २००७ आणि २०१२ मध्ये सेनेने एनडीए सोबत राहून देखील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. २००७ मध्ये काॅंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मराठी महिला म्हणून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच पाठींबा जाहीर केला होता.सन २०१२ मध्ये सेना प्रणव मुखर्जी यांच्या मागे उभी राहिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com