राजीव सातवांच्या आठवणी सांगतांना प्रियंका गांधी झाल्या भावूक..

राजकीय पक्षात अनेक लोक महत्वाकांक्षा घेऊन येतात, पण राजीव यांची महत्वाकांक्षा पक्षापेक्षा कधीच मोठी नव्हती.
Priyanka Gandhi- Rajiv Satav Memories News
Priyanka Gandhi- Rajiv Satav Memories News

औरंगाबाद ः राजीव सातव जेव्हा कोरोनाने आजारी होते, रुग्णालयात उपचार घेत होते, तेव्हा मी त्यांना एक मेसेज पाठवला होता. पण कदाचित तो मेसेज ते वाचू शकले नाही. या मेसेजमध्ये मी राजीव कोरोना विरुद्धचा लढा जिंकतील आणि त्यातून सुखरूप बाहेर येतील,असा विश्वास व्यक्त केला होता. (Priyanka Gandhi became emotional while reminiscing about Rajiv Satav) राजीव यांचे वय पाहता ते या आजारावर मात करतील असेच वाटत होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. आज पुन्हा  एकदा कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे दुःख अनुभवते आहे, अशा शब्दांत काॅंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्र काॅंग्रेस कमिटीच्या वतीने राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्हर्च्युल सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलामनबी आझाद, मल्लिकांर्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह राज्य व देशभरातील काॅंग्रेस नेत्यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राजीव सातव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगतांना प्रियंका गांधी भावूक झाल्या होत्या. सातव यांच्याव आमचा पूर्ण विश्वास होता. राजकीय पक्षात अनेक लोक महत्वाकांक्षा घेऊन येतात, पण राजीव यांची महत्वाकांक्षा पक्षापेक्षा कधीच मोठी नव्हती. (Rajiv seemed to get out of all this. I had expressed the same belief in the message sent while he was in a coma.) त्यांच्यावर जेव्हा रुग्णालयात उपचार सुरू होते, तेव्हा मी, राहुल वेळोवेळी डाॅक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत होतो. या सगळ्यातून राजीव बाहेर पडले असे वाटत होते. ते कोमात असतांना पाठवलेल्या मेसेजमध्ये मी हाच विश्वास व्यक्त केला होता.

सातव गेल्याचे दुःख आहे कारण त्यांचे नाव राजीव होते. ते देखील त्यांच्या कुटुंबाला सोडून ४६ वर्षाचे असतांनाच सोडून गेले. (Our father Rajiv Gandhi also left us when he was 46 years old.) आमचे वडील राजीव गांधी हे देखील ४६ वर्षांचे असतांनाच आम्हाला सोडून गेले. त्यामुळे आज पुन्हा कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचे दुःख होत असल्याचे सांगतांना प्रियंका गांधी भावूक झाल्या होत्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com