शिवसंपर्क मोहिमेत शिवसैनिकांचाच राडा; आजी-माजी आमदारांचे समर्थक भिडले..

आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला.
Shivsena  Mla Tanaji Sawant News Osmanabad
Shivsena Mla Tanaji Sawant News Osmanabad

उस्मानाबाद ः स्वबळ तपासण्यासाठी राज्यभरात शिवसेनेची शिवसंपर्क मोहिम सुरू आहे.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुरू असलेल्या या शिवसंपर्क मोहिमेला उस्मानाबादेत गालबोट लागले. विशेष म्हणजे तेही शिवसैनिकांकडूनच. (Radha of Shiv Sainiks in Shiv Sampark campaign; Supporters of former MLAs clashed)  शिवसंपर्क मोहिमेच्या बॅनरवर आमचे फोटो का लावले नाही? असे म्हणत आजी-माजी आमदारांचे समर्थक भिडले आणि मोठा राडा झाला. यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख गंभीर जखमी झाले आहेत.

माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व विद्यमाना आमदार तानाजी सांवत यांच्या समर्थकांमध्ये हा प्रकार घडला. (Shivsena Mla Tanji Sawant, Osmanabad) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे तीन पक्ष सत्तेत एकत्र असले तरी पक्ष पातळीवर तीन्ही पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करत आहेत.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर स्वबळावर सर्व निवडणुका लढवण्याची भाषा केली.(Shivsena Ex. Mla Dnayneshwar Patil) तर राष्ट्रवादीने देखील परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरात शिवसेनेने देखील शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून गावागावात आणि घराघरात शिवसेनेचे विचार पोहचवण्याची मोहिम सुरू केली.

शिवसेनेचे अनेक मंत्री व नेते या अभियानात सहभागी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज संस्थामध्ये देखील या पक्षाकडे सत्ता आहे. ही ताकद अधिक वाढवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शिवसंपर्क मोहिम राबवली जात असतांना आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. संपर्क मोहिमेच्या बॅनरवर फोटो का टाकला नाही? या कारणावरून हा वाद झाल्याचे समजते.

वाद विकोपाला जाऊन दोघांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आणि त्यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले. अभियानाच्या बॅनरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो लावला नाही म्हणून त्यांच्या समर्थकांनी जाब विचारताच सावंत समर्थक भडकले आणि त्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.  या वादामुळे पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्यातील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com