राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांचा विश्‍वासघात :  संजय कोले 

शरद जोशी म्हणायचे ज्यांचे पोट, शेतीवर अवलंबून आहे, ते खरे शेतकरी; मात्र राजू शेट्टी यांचे पोट शेतीवर अवलंबून नाही. त्यांच्या संपत्तीबद्दल त्यांचे एकेकाळचे सहकारी मित्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केली आहेत.
Raju Shetty
Raju Shetty

सांगली :  खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाशी संधान साधले आहे. कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीशी संधान साधून त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. खासदार शेट्टी यांचा कॉंग्रेसच मातृपक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे प्रमुख संजय कोले यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले, "सन 2004 मध्ये शेतकरी संघटनेने जातीवादी भाजपशी युती केली हे माझ्या स्वाभिमानाला मान्य नाही अशी भूमिका घेत कॉंग्रेसच्या हाताचा आधार घेतला. कॉंग्रेसने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी चळवळीत फूट पडावी म्हणून शेट्टींना हातभार लावला. त्याबदल्यात आमदारकी मिळवली. दरवर्षी शेतकरी संघटनेचे आंदोलन ऐन भरात असताना, मनमानीपणे तडजोड करत, आंदोलन विस्कळित करायचे, त्यांचीही किंमत घ्यायची, असे उद्योग करत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान त्यांनी केले. "

"कॉंग्रेसच्या सल्ल्याने 'स्वाभिमानी पक्ष' काढला. या पक्षाने प्रशांत परिचारक व संजय शिंदे या साखर सम्राटांना 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली होती. ज्या कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर भूसंपादन, भूधारणा कायदा शेतीमालावर जीवनावश्‍यक वस्तू कायदा, भू सुधारणा कायदा लागू केला, त्या कॉंग्रेससोबत राजू शेट्टी शेतकरी नेते म्हणून निघाले आहेत."

शीतल राजोबा, आक्रमउद्दीन जमादार, शंकर कापसे, अण्णा पाटील, बाबासाहेब पाटणे, राजाराम गोटखिंडे, वसंत भिसे उपस्थित होते. 

राजू शेट्टी शेतकरी नाहीत 
"शरद जोशी म्हणायचे ज्यांचे पोट, शेतीवर अवलंबून आहे, ते खरे शेतकरी; मात्र राजू शेट्टी यांचे पोट शेतीवर अवलंबून नाही. त्यांच्या संपत्तीबद्दल त्यांचे एकेकाळचे सहकारी मित्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वक्तवे केली आहेत. ती आजही खासदार शेट्टींनी नाकारलेली नाहीत. त्यामुळे राजू शेट्टी शेतकरीच नसल्यामुळे ते शेतकरी नेते तरी कसे.'' असा सवालही कोले यांनी यावेळी उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com