बाबीर यात्रेत जलसंधारणमंत्री राम शिंदे, आमदार दत्तात्रेय भरणे यांनी वाजविला गजढोल

महाराष्ट्रातील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापुरमधील बाबीर देवस्थान यात्रेत राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांनी चक्क गळ्यात ढोल घालून गजढोल नृत्य केले आणि यात्रेला उपस्थित असलेल्या लाखो लोकांना आश्चर्याचा धक्का दिला.
बाबीर यात्रेत जलसंधारणमंत्री राम शिंदे, आमदार दत्तात्रेय भरणे यांनी वाजविला गजढोल

सोलापूर : महाराष्ट्रातील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापुरमधील बाबीर देवस्थान यात्रेत राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांनी चक्क गळ्यात ढोल घालून गजढोल नृत्य केले आणि यात्रेला उपस्थित असलेल्या लाखो लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. 

इंदापुरमधील बाबीर यात्रेला राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातुन पाच लाखांपेक्षा जास्त लोक हजेरी लावत असतात. आज राज्याच्या जलसंधारणमंत्र्यांनी देखील हजेरी लावली आणि गळ्यात ढोल घालून डोक्यावर धनगरी फेटा बांधुन ढोलाच्या तालावर ठेका धरल्याने उपस्थित जनता देखील बघत राहीली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com