भाजप नेते रमेश आडसकरांची पूरग्रस्तांना पाच लाखांची मदत

राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पूर परिस्थितीने हाहाकार माजवला आहे. अशा संकटात सापडलेल्या जनतेला प्रत्येक क्षणाला मदतीची गरज आहे. याची जाणीव ठेवून आपले दिवंगत वडील आणि लोकनेते माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या पुण्यस्मरणार्थ रमेश आडसकर यांनी सोमवार (ता.१२) पाच लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली.
भाजप नेते रमेश आडसकरांची पूरग्रस्तांना पाच लाखांची मदत

केज : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पूर परिस्थितीने हाहाकार माजवला आहे. अशा संकटात सापडलेल्या जनतेला प्रत्येक क्षणाला मदतीची गरज आहे. याची जाणीव ठेवून आपले दिवंगत वडील आणि लोकनेते माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या पुण्यस्मरणार्थ रमेश आडसकर यांनी सोमवार (ता.१२) पाच लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली.

तालुक्यातील आडस येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे हा पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या विशिष्ट रांगड्या शैलीने ग्रामीण जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या तृतीय पुण्यस्मणार्थ आडस येथे सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. 

ज्यांनी आपल्या राजकीय जीवनात सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राजकारण केले. त्या आपल्या वडीलांच्या पुण्यस्मणार्थ आयोजित कार्यक्रमात पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी भाजप नेते आणि अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ऋषीकेश आडसकर यांनी पाच लाख रूपये मदतीचा धनादेश पालकमंत्र्यांना सुपूर्द केला. 

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडीत, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, माजी मंत्री  बदामराव पंडीत, आमदार संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, भिमराव धोंडे, माजी आमदार मोहन सोळंके, साहेबराव दरेकर, केशव आंधळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती संतोष हांगे उपस्थित होते. 

यावेळी अंबा कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील जनतेला पुराचा जोराचा फटका बसला आहे. सध्या तेथील जनतेला मदतीचा हात देणे हा आपला माणूसकीचा धर्म आहे. ही मनाशी दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून आडसकरांनी वडीलांच्या स्मृती जागवत पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदतीची खऱ्या अर्थाने गरज असलेल्या पूरग्रस्तांसाठी पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे देऊन मदतीचा हात दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com