'तोरणमाळ' प्रकरणी पर्यटनमंत्री रावलांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा :नवाब मलिक

"मोदी सांगत आहेत आम्ही खोदकाम सुरु केले आहे परंतु त्यांचे काम आम्ही कमी करत आहोत. आम्ही खोदकाम सुरु केलेल्यांवर कारवाई कधी करणार हेच पाहावे लागेल. तसेच रावल यांचे तोरणमाळ प्रकरण मोदी ईडीकडे पाठवणार का? "
Nawab Malik vs Jaykumar Raval
Nawab Malik vs Jaykumar Raval

मुंबई : " मोदी सरकारने जाहीर केलेल्या काळ्या यादीमधील दोन कंपन्या या पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या असून तात्काळ पर्यटनमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेवून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी", अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  नवाब मलिक यांनी केली.

 तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा.कंपनी एमटीडीसीच्या जागेवर आजही बेकायदेशीररित्या सुरु असून याप्रकरणाचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना देत आहोत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

"नोटबंदीच्या काळात मोदी सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख काळया यादीतील दोन कंपन्या या रावल यांच्या मालकीच्या आहेत. एमटीडीसीतील रिसॉर्ट रावल काबीज करून त्यामध्ये बेकायदेशीर दारुचा व्यवसाय करतात. त्यामध्ये ते चेअरमन पदाची कामगिरीही सांभाळत आहेत. हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या समोर होत असताना अजूनही ते गप्प आहेत. तरीही यासंबंधीचे कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना देत असून त्यावर त्वरित कारवाईची झालीच पाहिजे," अशी मागणी श्री . मलिक यांनी यावेळी केली.

तोरणमाळ रिसॉर्ट प्रकरण 
नवाब मलिक यांनी सांगितले , " १९९१ मध्ये एमटीडीसीकडून तोरणमाळ हिल रिसॉर्ट भाडयाने घेण्यात आले. त्यानंतर १९९६ मध्ये ५ वर्षांसाठी करार करण्यात आला. परंतु त्यानंतर पुन्हा २००१ ते २००६ पर्यंत १० वर्षासाठी भाडेकराराने घेतले  . परंतु त्याचे भाडे भरण्यातच आले नाहीत. उलट कंपनीने एमटीडीसीकडे ६० लाख खर्च झाल्याची मागणी केली. त्यानंतर एमटीडीसीने २०११ मध्ये सक्षम अधिकाऱ्यामार्फत भाडे भरा नाहीतर जागा खाली करा अशी नोटीस पाठवली. परंतु हे सांगण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर गावगुंडाच्या मदतीने हल्ला करण्यात आला . " 

" ७ जुन २०१७ ला हे रिसॉर्ट रजिस्टर करण्यात आले. तोरणमाळ गावामध्ये सातबारामध्येही जयकुमार रावल यांचे नाव आहे. याचबरोबरच रावल यांचे झोबा डॉट कॉमवर दहा कंपन्यामध्ये चेअरमन आहेत हेही दिसत आहे. या मंत्र्यांचे ४ डीन नंबर आहेत."

 हे रिसॉर्ट कार्यरत आहे की नाही याची माहिती घेतली असता, तोरणमाळ हिल रिसॉर्टमध्ये प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ७ हजार रुपये भरुन ऑनलाईन बुकींग केले, त्यावेळी हे रिसॉर्ट सुरु असल्याचे समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. 

"मोदी सांगत आहेत आम्ही खोदकाम सुरु केले आहे परंतु त्यांचे काम आम्ही कमी करत आहोत. आम्ही खोदकाम सुरु केलेल्यांवर कारवाई कधी करणार हेच पाहावे लागेल. तसेच रावल यांचे तोरणमाळ प्रकरण मोदी ईडीकडे पाठवणार का? " असा सवालही नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com